शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

मुस्लीम पर्सनल बोर्ड कोर्टात आव्हान देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 03:30 IST

Navi Delhi News: वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही मुस्लीम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असेही या संघटनेने जाहीर केले आहे. 

 नवी दिल्ली - वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ही मुस्लीम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे. तसेच या काळ्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल असेही या संघटनेने जाहीर केले आहे.

एआयएमपीएलबीचे सदस्य मोहम्मद अदीब यांनी सांगितले की, मुस्लिम समुदायाची मालमत्ता हडप करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. आम्ही ही चाल कधीही यशस्वी होऊ देणार नाही. वक्फ विधेयकाबाबतचा लढा आम्ही हरलो आहोत असे कोणीही समजू नये. आमच्या संघर्षाला आता सुरूवात झाली आहे. देश वाचविण्यासाठी आम्ही हा लढा देत आहोत. वक्फ सुधारणा कायदा हा भारताच्या एकात्मतेवर घाला आहे, असेही अदीब म्हणाले. 

उत्तर प्रदेशात कडक सुरक्षा व्यवस्थावक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बुधवारी सादर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ध्वजसंचलन केले. मुस्लीम संघटनांचा विधेयकाला विरोध आहे.  

विधेयक मागे घ्या; एम.के. स्टॅलिन यांची मागणीवक्फ सुधारणा विधेयक मागे घ्यावे अशी मागणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.  

विधेयकाला विरोधचओडिशातील विरोधी पक्ष असलेल्या बिजू जनता दलाने (बिजद) लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकालाच विरोध केला. आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी पक्षाचे नेते एम. गुरुमूर्ती यांनी सांगितले की, आमच्या पक्षाने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध दर्शविला आहे. माकपनेही विरोध केला आहे.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डCourtन्यायालय