शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम कायद्यांना मूलभूत हक्कांचे निकष गैरलागू - पर्सनल लॉ बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 04:59 IST

मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व व ‘निकाह हलाला’ या प्रथांच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी एक जनहित याचिका घटनापीठापुढे प्रलंबित आहे.

नवी दिल्ली : मुस्लिम व्यक्तिगत कायदे पवित्र कुरआन आणि स्वत: प्रेषित मोहम्मदाचे आचरण व शिकवण (हादिथ) यावर आधारलेले असल्याने त्यांची वैधता भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या निकषांवर तपासली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात केले.मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व व ‘निकाह हलाला’ या प्रथांच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी एक जनहित याचिका घटनापीठापुढे प्रलंबित आहे. त्या प्रकरणात पक्षकार म्हणून सहभागी होण्यासाठी केलेल्या अर्जात बोर्डाने हे प्रतिपादन केले आहे. बोर्ड म्हणते की, मुस्लिम व्यक्तिगत कायदे हा सांस्कृतिक विषय असून तो इस्लाम धर्माशी अविभाज्यपणे गोवलेला आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या दृष्टीने त्यांचे व्यक्तिगत कायदे हा राज्यघटनेने त्यांना दिलेल्या धर्माचरणाच्या स्वातंत्र्याचाच अभिन्न भाग आहे. मुस्लिमेतर व्यक्तीस इस्लामी व्यक्तिगत कायद्यांच्या वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिका करण्याची मुभा दिली जाऊ शकत नाही. कारण या कायद्यांनी त्यांना कोणतीही झळ पोहोचत नाही. एखाद्या मुस्लिम व्यक्तीने यासाठी याचिका करायची म्हटले तरी ती फक्त त्याच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल तरच केली जाऊ शकेल.पॉलिगामी व निकाह हलाला- पॉलिगामी’ म्हणजे एका पुरुषाला एकाच वेळी एकाहून अधिक स्त्रियांशी वैवाहिक संबंध ठेवण्यास असलेली मुभा.- ‘निकाह हलाला’ म्हणजे घटस्फोट दिलेल्या पत्नीशीच पुन्हा विवाह करायचा असेल, तर तिने घटस्फोटानंतर अन्य एखाद्याशी निकाह लावून शरीरसंबंध ठेवल्याखेरीज तिच्याशी विवाहास मुस्लिम पुरुषांना लागू असलेला प्रतिबंध.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय