मुस्लिम मुलगी नवरात्रोत्सवात करते दुर्गामातेची पूजा
By Admin | Updated: April 12, 2016 23:19 IST2016-04-12T23:17:46+5:302016-04-12T23:19:58+5:30
आग्रा शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोहरा गावातली मुस्लिम मुलगी रोझा सोबत नवरात्रीत उपवासही धरते.

मुस्लिम मुलगी नवरात्रोत्सवात करते दुर्गामातेची पूजा
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. १२- मुस्लिम तरुणी नाफिसा न चुकता रमझानला रोझा करते. मात्र तीच मुलगी नवरात्रोत्सवात नऊ दिवस न विसरता उपवासही करते. आग्रा शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोहरा गावातली मुस्लिम मुलगी रोझा सोबत नवरात्रीत उपवासही धरते.
लहानपणापासून नाफिजा ही मुलगी दुर्गामातेचा नऊ दिवस कडक उपवास करत आहे. आम्ही आमच्या कुटुंबात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मीयांचे सण साजरे करतो, अशी माहिती 15 वर्षीय नाफिजाचे वडील नूर मोहम्मद यांनी ही दिली आहे.
यावेळी नाफिजानं माझी आई हसिना दररोज हिंदू महिलांसोबत मंदिरात जात असल्याचंही सांगितलं आहे. कुटुंबातले सहाना, महक, सप्ना, शहाला, खुशबू यांच्यासह गावातल्या इतर सहा जणी नवरात्रोत्सवात उपवास धरत असल्याचं नाफिजानं सांगितलं आहे.