संगीतकार नदीमला लागले भारतात परतायचे वेध
By Admin | Updated: June 30, 2017 07:01 IST2017-06-30T06:40:52+5:302017-06-30T07:01:58+5:30
प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी नदीम-श्रवणमधील नदीम अख्तर सैफी याला भारतात परतण्याचे वेध लागले आहेत. टी सिरीजचे साम्राज्य उभारणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप

संगीतकार नदीमला लागले भारतात परतायचे वेध
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.30 - प्रसिद्ध संगीतकार जोडगोळी नदीम-श्रवणमधील नदीम अख्तर सैफी याला भारतात परतण्याचे वेध लागले आहेत. टी सिरीजचे साम्राज्य उभारणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. या आरोपांमुळे पोलिसांची कारवाई चुकवण्यासाठी नदीम 1997 मध्ये लंडनला पळाला होता. तेव्हापासून त्याने ब्रिटनचा आश्रय घेतला आहे.
नदीमने संगीतबद्ध केलेला नवा सिनेमा "एक हसीना थी एक दीवाना था" लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या एका प्रमोशनल कार्यक्रमात नदीमने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनापासून भारतात परतण्याची इच्छा असल्याचं तो म्हणाला. "माझ्यावर ठेवण्यात आलेले आरोप चुकीचे होते आणि त्या संबंधी न्यायालयीन खटलाही मी जिंकलो आहे. माझ्या मनात भारत आहे, त्यामुळे मला मनापासून भारतात परतण्याची इच्छा आहे. पण त्यांनी मला सन्मानाने बोलवावं, मी भारतीय आहे आणि माझं माझ्या देशावर प्रेम आहे"", असं म्हणत त्याने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली.
मुंबईमध्ये 12 ऑगस्ट 1997 रोजी कॅसेटकींग गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.