मुशर्रफांचा काश्मीर फॉम्यरुला अद्भुत होता
By Admin | Updated: November 9, 2014 02:34 IST2014-11-09T02:34:41+5:302014-11-09T02:34:41+5:30
काश्मीर मुद्यावरील स्थायी तोडग्यासाठी हा प्रस्ताव एक मोठा आधार ठरला असता़ पण भारताने मुशर्रफ यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला,

मुशर्रफांचा काश्मीर फॉम्यरुला अद्भुत होता
श्रीनगर : काश्मीर मुद्यावर पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांनी मांडलेला चार कलमी फॉम्र्युला एक अद्भुत प्रस्ताव होता़ काश्मीर मुद्यावरील स्थायी तोडग्यासाठी हा प्रस्ताव एक मोठा आधार ठरला असता़ पण भारताने मुशर्रफ यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला, असे मत भाजपाचे माजी खासदार आणि नामवंत विधिज्ञ राम जेठमलानी यांनी मांडले आह़े
शनिवारी पत्रकारांशी बोलताना, 92 वर्षीय जेठमलानी मुशर्रफ यांच्या प्रस्तावाचे समर्थन करताना दिसल़े फुटीरवाद्यांर्पयत पोहोचण्याच्या हेतूने सन 2क्क्2 मध्ये गठित काश्मीर समितीचे जेठमलानी अध्यक्ष आहेत़ याच पाश्र्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होत़े मुशर्रफ ठोस आणि प्रामाणिक हेतूने भारतात आले होत़े काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सुचवलेला प्रस्ताव शानदार होता़ हा प्रस्ताव एक अद्भुत दस्तऐवज आहे; पण मुशर्रफ यांचे प्रयत्न पाकिस्तानने नव्हे, तर भारताने हाणून पाडल़े मी दीर्घ काळापासून काश्मीरसाठी काम करीत आह़े मुशर्रफ हे जाणून होत़े त्यामुळे एका मित्रच्या मदतीने त्यांनी मला तो प्रस्ताव पाठवला होता़ मी काश्मीर समितीच्या वतीने या प्रस्तावात काही बदल सुचवले होत़े विशेष म्हणजे मुशर्रफ यांनाही हे बदल मान्य होत़े मला हा प्रस्ताव स्वीकारण्यात कुठलीही अडचण वाटली नव्हती, असे जेठमलानींनी सांगितल़े (वृत्तसंस्था)