संशयामुळेच खुनी हल्ला
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:10+5:302015-02-14T01:07:10+5:30
आरोपींचा पीसीआर : हत्यार फेकले, वाहन जप्त

संशयामुळेच खुनी हल्ला
आ ोपींचा पीसीआर : हत्यार फेकले, वाहन जप्त नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर गुरुवारी दुपारी झालेला प्राणघातक हल्ला व्यावसायिक स्पर्धेतील संशयामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पप्पू ऊर्फ महेश फुलचंद जयस्वाल (वय ४९) आणि अशोक संपत वाघमारे (वय ५५) या दोघांना अटक करून त्यांचा आज कोर्टातून सोमवारपर्यंत पीसीआर मिळवला. आरोपी पप्पू जयस्वाल हा एमआयडीसीत रायफल बार चालवत होता. बार मालकाने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे नासुप्रने २ फेब्रुवारीला रायफल बारचे अतिक्रमण तोडले. राजू जयस्वाल यांनीच तक्रार केल्यामुळे ही कारवाई झाली, असा संशय आरोपी पप्पूला होता. त्यामुळे त्याने कुख्यात गुन्हेगार अशोकच्या मदतीने गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास राजू यांच्या होंडा सिटी कारला सेंट झेवियर स्कूलजवळ महिंद्रा कारची जोरदार धडक मारली. धोका लक्षात घेत राजू यांनी कारमधून पळ काढला असता आरोपींनी त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचे प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर अशोकने चाकूचा घाव घालण्याचे प्रयत्न केले तर पप्पूने रॉडने जोरदार हल्ला चढवला. या हल्लयात गंभीर जखमी झालेल्या राजू यांच्यावर वोक्हार्टमध्ये उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पप्पू आणि अशोकला अटक केली. त्यांचे वाहनही जप्त केले. आज त्यांना कोर्टात हजर करून त्यांची चार दिवसांची कोठडी मिळवली. आरोपींकडून चाकू जप्त करायचा आहे, असे पोलीस सांगतात.