नंदनवनमध्ये तरुणाची हत्या
By Admin | Updated: July 20, 2015 23:59 IST2015-07-20T23:59:27+5:302015-07-20T23:59:27+5:30
नागपूर : बहिणीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिची मदत करणाऱ्या तरुणाची हत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. डिंकेश नारायणराव बारेवार (वय २३) असे मृताचे तर राहुल कामडे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही खरबीच्या साईनगरात राहतात.

नंदनवनमध्ये तरुणाची हत्या
न गपूर : बहिणीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त झालेल्या तरुणाने तिची मदत करणाऱ्या तरुणाची हत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. डिंकेश नारायणराव बारेवार (वय २३) असे मृताचे तर राहुल कामडे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही खरबीच्या साईनगरात राहतात. राहुलच्या बहिणीने दोन महिन्यापूर्वी एका तरुणाशी प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह करण्यासाठी तरुणी आणि तरुणाची डिंकेशने मदत केली. त्यामुळे राहुल डिंकेशवर चिडून होता. या कारणावरून तो डिंकेशसोबत वाद घालत होता तर, राहूलला डिंकेश याच नाजूक विषयावरून जास्त चिडवायचा. त्याला चारचौघात टोमणे मारायचा. सोमवारी रात्री ७ च्या सुमारास अशाच प्रकारे हे दोघे वस्तीत समोरासमोर आले. डिंकेशने राहुलची पुन्हा टर उडवणे सुरू केले. त्यामुळे संतप्त झालेल्या राहुलने डिंकेशच्या डोक्यावर लाकडी फळी मारली. गंभीर अवस्थेत डिंकेशला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डिंकेशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. माहिती कळताच नंदनवन पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. ---