फरिदाबादमध्ये युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:38 IST2019-11-12T04:37:37+5:302019-11-12T04:38:01+5:30
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये दुचाकीस्वार दोन युवकांनी कारमधील युवकाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली.

फरिदाबादमध्ये युवकाची हत्या
फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबादमध्ये दुचाकीस्वार दोन युवकांनी कारमधील युवकाची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली. हा युवक सकाळी १० वाजता कारमध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी राष्टÑीय महामार्गावर गेला असताना हा प्रकार घडला. हत्येनंतर दोन युवक फरार झाले. हत्या झालेल्या युवकाचा व त्याच्या पत्नीचा न्यायालयात वाद चालू आहे. त्यातून हा प्रकार झाला आहे का, या दृष्टीने तपास सुरू आहे.