नंदनवनमध्ये हत्या
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:02+5:302015-02-16T23:55:02+5:30
नंदनवनमध्ये पुन्हा एकाची हत्या

नंदनवनमध्ये हत्या
न दनवनमध्ये पुन्हा एकाची हत्या२४ तासांत दुसरी घटना : पोलिसांनाही हादरानागपूर : नेहरूनगरात आज सकाळी ८ वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्रांचे वार आढळल्यामुळे नंदनवन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. २४ तासांच्या आत नंदनवनमध्ये घडलेली हत्येची ही दुसरी घटना होय. आज सकाळी नेहरूनगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळ ३० ते ३५ वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. मृत तरुणाची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असून, त्याच्या शरीरावर काळया रंगाची जीन्स पॅन्ट, गोल गळ्याचे ऑरेंज टी-शर्ट तसेच काळ्या रंगाचे शर्ट आणि मळकट रंगाचे जर्कींन आहे. त्याच्या डोक्यापासून कंबरेपर्यंत वार करून हल्लेखोरांनी त्याला ठार मारले़ रविवारी अशाच प्रकारे नंदनवनमधीलच तुलसीनगर रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या नाल्यात एका तरुणाचा विवस्त्र मृतदेह आढळला होता. ५ फूट ६ इंच, उजव्या हातात स्टीलचे कडे व कमरेत नाडाअसलेला या व्यक्तीच्या डोक्यापासुन कंबरेच्या खालपर्यंत धारदार तसेच टोकदार शस्त्राने आरोपींनी वार केले आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकून दिला. या दोन्ही हत्येच्या घटनांमधील साम्य बघता त्यातील आरोपी एकच असावेत, असा पोलिसांनी अंदाज बांधला आहे. दोघांचीही ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. संबंधित वर्णनाच्या व्यक्तीशी संबंध असलेल्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ----