डॉक्टरचा खून करून घेतला मुलीच्या मृत्यूचा बदला

By Admin | Updated: April 23, 2016 12:55 IST2016-04-23T12:55:36+5:302016-04-23T12:55:36+5:30

तीन महिन्याच्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी डॉक्टरचा खून केल्याची घटना उघड झाली आहे

The murder of the doctor killed the girl's death | डॉक्टरचा खून करून घेतला मुलीच्या मृत्यूचा बदला

डॉक्टरचा खून करून घेतला मुलीच्या मृत्यूचा बदला

>ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 23 - तीन महिन्याच्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी डॉक्टरचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. बिजनोर पोलीसांनी डॉ सुनील कुमार यांच्या हत्येप्रकरणी मानिक राठी व त्याचा मेहुणा शुभम त्यागी या दोघांना अटक केली आहे. 
पोलीसांनी सांगितले की, राठींच्या तीन महिन्यांच्या मुलीवर डॉ सुनील कुमार उपचार करत होते. 17 एप्रिल रोजी डॉक्टरांनी राठींच्या घरी जाऊन तिच्या मुलीची तपासणी केली. परंतु 18 एप्रिल रोजी तिची प्रकृती बिघडली. राठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु सुनील कुमार हॉस्पिटलमध्ये नव्हते. राठींनी तिला शेवटी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु मुलीची प्रकृती बिघडली आणि ती मरण पावली. आपल्या मुलीच्या मृत्यूला डॉ सुनील कुमारच जबाबदार असल्याची धारणा झालेल्या राठींनी मेहुण्याची शुभम त्यागीची मदत घेतली.
राठींनी सुनील कुमार यांच्या दवाखान्यात जाऊन जवळून गोळ्या घालून त्यांचा खून केला आणि शुभमच्या मोटरसायकलवर बसून पळून गेले. पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.

Web Title: The murder of the doctor killed the girl's death