उपमहानिरीक्षकांकडून हत्येची दखल
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:13+5:302015-02-14T23:52:13+5:30
शेवगाव : नाशिक पोलीस महाक्षेत्राचे प्रभारी पोलीस उपमहानिरीक्षक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी शेवगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या हत्येच्या तपासाविषयी अधिकार्यांना सूचना दिल्या.

उपमहानिरीक्षकांकडून हत्येची दखल
श वगाव : नाशिक पोलीस महाक्षेत्राचे प्रभारी पोलीस उपमहानिरीक्षक सुनील रामानंद यांनी शुक्रवारी शेवगाव पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या हत्येच्या तपासाविषयी अधिकार्यांना सूचना दिल्या.मयत कोलते पोलीस कुटुंबातीलच सदस्य असल्याने मारेकर्याला लवकरात लवकर गजाआड केले जाईल, असा विश्वास रामानंद यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुंगी-हातगाव मार्गावरील जायकवाडी उजव्या कालव्याजवळील घटनास्थळालाही रामानंद यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे/साळुंके, उपविभागीय अधिकारी वाय.डी.पाटील, शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक, तपासी अधिकारी संपत भोसले होते.