शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 11:10 IST

आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चिदंबरम यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. दरम्यान, काल रात्री अटक करण्यात आलेल्या चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पी. चिदंबरम यांना करण्यात आलेल्या अटकेविरोधात काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, '' गेल्या दोन दिवसांमध्ये देशाने प्रसारमाध्यमांमधून लोकशाहीची दिवसाढवळ्या आणि कधीकधी रात्री हत्या झाल्याचे पाहिले आहे. सध्याच्या भाजपा सरकारने ईडी आणि सीबीआयला वैयक्तिक बदला घेणाऱ्या संस्थांमध्ये परिवर्तित करून टाकले आहे. पूर्वग्रह आणि वैयक्तिक बदला घेण्याच्या भावनेतून चिदंबरम यांना ज्याप्रकारे अटक करण्यात आली त्यावरून  मोदी सरकार वैयक्तिक बदला घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, हे सिद्ध झाले.'' सरकारला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावाही काँग्रेसने केला. ''आज भाजपाचे सरकार देशाला भयंकर मंदीच्या लाटेतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजन करण्यात अपयशी ठरले आहे. लोक लाखोंच्या संख्येने रोजगार गमावत आहेत. रुपयाचे मूल्य घसरले आहे. प्रत्येक क्षेत्राला मंदीची झळ बसत आहे. या प्रश्नांवरून देशाचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या दोन दिवसांमध्ये चिदंबरम यांच्या अटकेचे नाटक रंगवले आहे.  

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसPoliticsराजकारण