म्हैसूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची हत्या
By Admin | Updated: March 14, 2016 13:36 IST2016-03-14T13:36:47+5:302016-03-14T13:36:47+5:30
कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे

म्हैसूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांची हत्या
>ऑनलाइन लोकमत -
म्हैसूर, दि. १४ - कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. बी राजू असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव असून रविवारी चहाच्या टपरीवर उभे असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
शहरात प्रतिबंधात्मक सुचना देण्यात आल्या आहेत. परिस्थिती सद्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रविवारी याप्रकरणी भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणा देत आंदोलन केलं.पोलिसांनी जलदगतीने तपास करत हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.