शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुरादपूरचं होणार मुरलीपूर, इस्लामनगरचं ईश्वरनगर! या राज्यात एकाच जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलणार    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:31 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये शहरांची नावं बदलण्याची सुरू केलेली परंपरा आता मध्य प्रदेश सरकारनेही अंगीकारली आहे. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गावांची नावं बदलण्याचा धडाका लावला असून, आता राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

देवास जिल्ह्यातील पीपलरांवा गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांना भाजपा जिल्हाध्यक्षांनी गावांची नावं बदलण्याबाबत एक यादी सोपवली. तसेच या गावांची नावं बदलण्यात यावी, अशी जनभावना असल्याचे सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच जिल्हाध्यक्ष रायसिंह सैंधव यांचा प्रस्ताव स्वीकारला. तसेच या ५४ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली. तसेच या गावांची नावं बदलण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आता प्रशासकीय पातळीवर या गावांची नावं बदलली जातील.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच गावांची नावं बदलण्याची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री शाजापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मंचावरूनच ११ गावांची नावं बदलण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून ज्या गावांची नावं उर्दू-अरबी भाषेत आहेत, अशा गावांची नावं बदलली जात आहेत. देवास जिल्ह्यामधील ज्या ५४ गावांची नावं बदलण्याची विनंती जिल्हाध्यक्षांनी केली होती त्या गावांमधील काही गावांची नावं मुरादपूर, हैदरपूर, शमशाबाद आमि इस्लामनगर अशी आहेत. मुख्यमंत्र्यांना जिल्हाध्यक्षांना या गावांच्या सध्याच्या नावांसोबत नव्या नावांची यादीही सोपवली आहे. त्यात मुरादपूरचं मुरलीपूर, हैदरपूरचं हीरापूर, शमशाबादचं श्यामपूर,  इस्माइल खेडी गावाचं ईश्वरपूर, अलीपूरचं रामपूर, नबीपूरचं नयापूर आणि मिर्झापूरचं मीरापूर असं नामकरण सूचवण्यात आलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा