इगतपुरी भाजप शहर अध्यक्षपदी मुन्ना पवार यांची बिनविरोध निवड
By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:01+5:302016-01-03T00:05:01+5:30
इगतपुरी : शहर कार्यकारिणीत बदल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून इगतपुरी तालुका पक्ष निवडणूक निर्णय अधिकारी व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन वानखेडे यांनी इगतपुरी पक्ष निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदू गाढवे यांना जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार गाढवे यांनी बुधवारी ३० डिसेंबर रोजी शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालयात भाजपा पदाधिकार्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन शहराध्यक्ष व सरचिटणीसपदाची निवडणूक प्रक्रि या पार पाडली. यावेळी इगतपुरी शहराध्यक्ष पदाकरिता केवळ एकच नाम निर्देश पत्र सादर झाल्याने पुन्हा त्याच पदावर शिक्का मोर्तब ठरलेले अँड. मुन्ना पवार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तर शहर सरचिटणीस पदी सागर हंडोरे यांची निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्याने या निवडीचे पत्र अँड. मुन्ना पवार यांना तालुका अध्यक्ष पांडुरंग बर्हे, निवड अधिकारी नंदु गाढवे यांच्या हस्ते देण्यात आले. (

इगतपुरी भाजप शहर अध्यक्षपदी मुन्ना पवार यांची बिनविरोध निवड
इ तपुरी : शहर कार्यकारिणीत बदल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून इगतपुरी तालुका पक्ष निवडणूक निर्णय अधिकारी व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन वानखेडे यांनी इगतपुरी पक्ष निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदू गाढवे यांना जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार गाढवे यांनी बुधवारी ३० डिसेंबर रोजी शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाचनालयात भाजपा पदाधिकार्यांसमवेत एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन शहराध्यक्ष व सरचिटणीसपदाची निवडणूक प्रक्रि या पार पाडली. यावेळी इगतपुरी शहराध्यक्ष पदाकरिता केवळ एकच नाम निर्देश पत्र सादर झाल्याने पुन्हा त्याच पदावर शिक्का मोर्तब ठरलेले अँड. मुन्ना पवार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तर शहर सरचिटणीस पदी सागर हंडोरे यांची निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्याने या निवडीचे पत्र अँड. मुन्ना पवार यांना तालुका अध्यक्ष पांडुरंग बर्हे, निवड अधिकारी नंदु गाढवे यांच्या हस्ते देण्यात आले. (वार्ताहर ) (फोटो: ०२इगतपूरी, आयएनटीपीएच )