शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सचिवांना खोलीत कोंडले, महापौरांच्या आसनावर चढले नगरसेवक, दिल्ली MCD मध्ये रणकंदन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 22:21 IST

Delhi MCD News: दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र  परिस्थिती अशी उद्भवली की, बैठक सुरू करणंच कठीण झालं.

दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीत पुन्हा एकदा जोरदार राडा झाला आहे. महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. मात्र  परिस्थिती अशी उद्भवली की, बैठक सुरू करणंच कठीण झालं. महापौर त्यांच्या आसनावर विराजमान झाल्यानंतर आक्रमक झालेले भाजपाचे नगरसेवक त्यांच्या आसनाकडे धावले आणि टेबलावर उभे राहिले.

हा गोंधळ इथेच थांबला नाही तर सभागृहाचं कामकाज सुरू होऊ नये म्हणून, भाजपाच्या नगरसेवकांनी महानगरपालिका सचिव शिवप्रसाद के.व्ही. यांच्या कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर त्यांना कार्यालयातच कोंडून तिथेच आंदोलन करण्यास सुरुवात केली. आम आदमी पक्ष चुकीच्या पद्धतीने स्थायी समितीच्या शक्तींचं हस्तांतरण करण्याचा प्रयत्न करत आहे, हे बेकायदेशीर आहे. असा आरोप भाजपाच्या नगरसेवकांनी केला.  दरम्यान, या कृत्यावरून आम आदमी पक्षाने भाजपावर टीका केली आहे. तसेच ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला.

दिल्लीच्या महानगरपालिकेमध्ये आप आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची ही काही पहिली घटना नाही. सभागृहाच्या पहिल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. तिथून सुरू झालेला वाद अजूनही सुरू आहे. विरोधी नगरसेवक हे महापौर शैली ओबेरॉय यांच्या आसनासमोरील टेबलावर चढले. तसेच त्यांनी कामकाजाची कागदपत्रे फाडली. महानगरपालिकेच्या १८ सदस्यीय स्थायी समितीचं पुनर्गठन गेल्या १० महिन्यांपासून प्रलंबित आहे.

आज महापौर ओबेरॉय यांनी सभागृहात प्रवेश करताच भाजपा नगरसेवकांनी हुकूमशाही चालणार नाही. संविधानाची हत्या बंद करा, अशा घोषणा देण्यास सुरू केली. तसेच प्रस्तावाचे कागद फाडले. तसेच फाटलेले तुकडे हवेत भिरकावले.   

टॅग्स :delhiदिल्लीAAPआपBJPभाजपा