महापालिका सिंगल बातम्या.....

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30

भाजपच्या महासंपर्क अभियानास प्रारंभ

Municipal News | महापालिका सिंगल बातम्या.....

महापालिका सिंगल बातम्या.....

जपच्या महासंपर्क अभियानास प्रारंभ
सोलापूर: भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहर भाजपच्या वतीने महासंपर्क अभियान सुरू करण्यात आले. शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या हस्ते मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू, नगरसेवक शिवानंद पाटील, कृष्णाहरी दुस्सा, बाबुराव घुगे, प्रशांत फत्तेपूरकर, अशोक कटके, श्रीनिवास नल्ला, शिक्षण मंडळ विरोधी पक्षनेता दत्तात्रय गणपा, परिवहन सदस्य मल्लिनाथ याळगी, दत्तू पोसा, श्रीनिवास दायमा, लक्ष्मीकांत गड्डम, डॉ. शिवराज सरतापे आदी उपस्थित होते.
लोकशाही दिनात ८ तक्रारींचा निपटारा
सोलापूर : महापालिकेत आयोजित लोकशाही दिनात १२ पैकी ८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उपायुक्त श्रीकांत मायकलवार, सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यात बेकायदेशीर कामाबाबत बांधकाम विभाग संबंधित तीन तक्रारी आल्या आहेत. त्यांचा निपटारा झाला नाही. रस्ता न करता निधी परत पाठविल्याबाबत दोन तक्रारी होत्या, त्यातील एक तक्रार निकाली काढण्यात आली. बांधकाम विभागातील भ्रष्ट कारभार, सांडपाण्याचा निचरा, युजर चार्जेस आकारणी न करणे, मिळकत आकारणी दुरुस्त करणे आदी तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
मनपात उद्या होणार माहिती अधिकार दिन
सोलापूर : महापालिकेत बुधवार दि. ८ जुलै रोजी माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. दर महिन्याच्या दुसर्‍या बुधवारी इंद्रभुवनाच्या इमारतीत माहिती अधिकार दिनाचे आयोजन केले जाते. या दिवशी सकाळी ११ ते १ या वेळात माहिती अधिकार विचार मंचचे विद्याधर दोशी व त्यांचे कार्यकर्ते माहिती अधिकार कायद्याबाबत नागरिकांना विनामूल्य मार्गदर्शन करतात. माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यावर महापालिकेशी संबंधित माहिती विहित शुल्क आकारून उपलब्ध केली जाते. या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Municipal News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.