नदीसुधारणेच्या कामकाजासाठी पालिकेचा आता स्वतंत्र अधिकारी

By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:20+5:302015-07-06T23:34:20+5:30

पुणे : केंद्रशासनाने नदी सुधारणेसाठी 990 कोटींच्या अनुदानास मागील आठवडयात मान्यता दिली आहे. असे असतानाच , या कामासाठी तसेच नदीबाबत येणा-या तक्रारींचे निरासरण करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी ( दि. 3) रोजी काढले आहेत. या आदेशानुसार, ही जबाबदारी मालमत्ता विभागाचे उपायुक्त सतिश कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

The Municipal Corporation's independent officer | नदीसुधारणेच्या कामकाजासाठी पालिकेचा आता स्वतंत्र अधिकारी

नदीसुधारणेच्या कामकाजासाठी पालिकेचा आता स्वतंत्र अधिकारी

णे : केंद्रशासनाने नदी सुधारणेसाठी 990 कोटींच्या अनुदानास मागील आठवडयात मान्यता दिली आहे. असे असतानाच , या कामासाठी तसेच नदीबाबत येणा-या तक्रारींचे निरासरण करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी ( दि. 3) रोजी काढले आहेत. या आदेशानुसार, ही जबाबदारी मालमत्ता विभागाचे उपायुक्त सतिश कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षात शहराच्या मध्यातून वाहणा-या मुळा-मुठा नदीची मोठी दुरावस्था झालेली आहे. त्यातच नदीपात्रात होणारे अतिक्रमण तसेच राडारोडा टाकण्याचे प्रमाणही दिवसें दिवस वाढतच आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने शहरातील पर्यावरण प्रेमींकडून महापालिकेकडे या प्रकाराच्या तक्रारी केल्या जातात. तसेच राष्ट्रीय हरीत लवादाचे न्यायालयही पुण्यात सुरू झाल्याने नदी संदर्भातील अनेक खटले महापालिके विरोधात या न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नदी सुधारणेच्या कामात समन्वय ठेवण्यासाठी कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे कुमार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कामासाठी कुलकर्णी यांनी विधी विभाग, पर्यावरण विभाग, मुख्य अभियंता ( प्रकल्प) यांच्याशी समन्वय ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच नदी संवर्धनासाठी पालिकेचा स्वतंत्र अधिकारी असणार आहे.
=================================

Web Title: The Municipal Corporation's independent officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.