मनपाच्या २२२ कोटींवर फिरणार पाणी गाळेधारकांकडील थकबाकी : प्रशासनाकडून नाचविले जाताहेत कागदी घोडे; वसुली अशक्यच

By Admin | Updated: January 14, 2016 23:59 IST2016-01-14T23:59:39+5:302016-01-14T23:59:39+5:30

जळगाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्‍यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्याने बिलांचे वाटप सुरू झाल्याने थकबाकीच्या रकमेत ९० कोटींची भर पडून ही रक्कम २२२ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान मनपा प्रशासनातर्फे मालमत्ता करातून ही वसुली करण्यात येईल, असे सांगितले जात असले तरीही ते प्रत्यक्षात अशक्य असल्याचे मानले जात आहे.

Municipal Corporation's 222 crores revolve around water holders: The horses that are danced by the administration; Impossible to recover | मनपाच्या २२२ कोटींवर फिरणार पाणी गाळेधारकांकडील थकबाकी : प्रशासनाकडून नाचविले जाताहेत कागदी घोडे; वसुली अशक्यच

मनपाच्या २२२ कोटींवर फिरणार पाणी गाळेधारकांकडील थकबाकी : प्रशासनाकडून नाचविले जाताहेत कागदी घोडे; वसुली अशक्यच

गाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्‍यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्याने बिलांचे वाटप सुरू झाल्याने थकबाकीच्या रकमेत ९० कोटींची भर पडून ही रक्कम २२२ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान मनपा प्रशासनातर्फे मालमत्ता करातून ही वसुली करण्यात येईल, असे सांगितले जात असले तरीही ते प्रत्यक्षात अशक्य असल्याचे मानले जात आहे.
मनपाच्या १८ मार्केटमधील गाळेधारकांचा करार संपला आहे. त्यापैकी फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांचा करार २०१२ मध्येच संपला आहे. त्यानंतर इतर मार्केटमधील गाळेधारकांचा करार संपला. मात्र या गाळेधारकांनी कराराची मुदत संपूनही महाराष्ट्र मनपा अधिनियम कलम ८१(ब) नुसार मनपाला गाळे रिकामे करून परत देणे आवश्यक असताना ते केलेले नाहीत. त्यामुळे मनपाने महासभेत ठराव करून या गाळेधारकांना कराराची मुदत संपल्याने रेडिरेकनरच्या दराने भाडे व त्यावर पाच पट दंड आकारण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार किरकोळ वसुलीविभागातर्फे गाळेधारकांना थकबाकीवसुलीसाठी बिलेही वाटप करण्यात आली. मात्र व्यापार्‍यांनी ही थकबाकी भरण्यास नकार दिला आहे. पूर्वीच्या भाड्याप्रमाणेच थकबाकी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम फुगली असून दरवर्षी त्यात भर पडत आहे. आता किरकोळ वसुली विभागाने नवीन बिले देण्याची तयारी सुरू केली असून त्यामुळे थकबाकीचा आकडा २२२ कोटींवर पोहोचला आहे.
----- इन्फो----
मनपाला प्रत नाही
मनपात अनेक वर्ष उपायुक्त म्हणून काम केलेल्या तसेच सध्या अपर आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असलेल्या अपर जिल्हाधिकारी साजीदखान पठाण यांनीच मनपाविरुद्ध अहवाल शासनाला सादर केला आहे. मात्र मनपाला त्याची प्रत देण्यात आलेली नाही. त्यामुळे बैठकीत मनपाकडे उपलब्ध माहिती घेऊनच उत्तरे द्यावी लागणार आहेत.
----- इन्फो----
मार्केट जागा मालकीबाबत प्रधान सचिवांकडे आज बैठक
मनपाचे महात्मा फुले, सेंट्रल फुले मार्केट व शास्त्री टॉवर मार्केट असलेली जागा शासनाची असल्याने यावरील मार्केटमधील गाळ्यांबाबत महसूल विभाग निर्णय घेईल, असा निर्णय शासनाने दिला आहे. मात्र मनपाने ही जागा महसूल विभागाने निरंतर वापरसाठी मनपाला दिलेली असून मनपाने कुठलाही शर्तभंग केलेला नाही. त्यामुळे ही जागा आता मनपाचीच असल्याचा दावा केला आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी मंत्रालयात याबाबत बैठक आयोजित केली आहे. त्यात मनपातर्फे नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम हे उपस्थित राहणार आहेत.

----- इन्फो----
थकबाकी वसुली अवघड
मनपा प्रशासनाने वसुली का केली नाही? याची विचारणा न्यायालयात दाखल दाव्यांमध्येदेखील होत असल्याने ढीम्म मनपा प्रशासनाने आता या थकबाकी वसुलीसाठी तयारी सुरू केली आहे. गाळेधारकांना थकीत भाडे मालमत्तारातून वसुल करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत विधी विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. मात्र गाळेधारकाच्या नावावर शहरात कुठे व कोणती मालमत्ता आहे? याचा शोध मनपाला घरप˜ी विभागामार्फत घ्यावा लागणार आहे. त्यातच जर गाळेधारकाच्या स्वत:च्या नावावर घर अगर इतर मालमत्ता नसल्यास व नातेवाईकांच्या नावावर असल्यास मालमत्ताकरातून ही थकबाकी वसूल करणे अवघड होणार आहे.

Web Title: Municipal Corporation's 222 crores revolve around water holders: The horses that are danced by the administration; Impossible to recover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.