शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई मनपा : महापौरांचे आयुक्तांना पत्र

By admin | Published: May 5, 2016 07:30 PM2016-05-05T19:30:37+5:302016-05-05T19:30:37+5:30

जळगाव : शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न मनपाकडून स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्यांच्या मदतीने सुरू आहेत. मात्र काही खाजगी जाहिरातदार या चौकांमध्ये पोस्टर, होर्डीर्ंग लावून विद्रुपीकरण करीत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.

Municipal Corporation to take action against insurgents: Letter to Commissioner of the Mayor | शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई मनपा : महापौरांचे आयुक्तांना पत्र

शहर विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई मनपा : महापौरांचे आयुक्तांना पत्र

Next
गाव : शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याचे प्रयत्न मनपाकडून स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्यांच्या मदतीने सुरू आहेत. मात्र काही खाजगी जाहिरातदार या चौकांमध्ये पोस्टर, होर्डीर्ंग लावून विद्रुपीकरण करीत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
शहरातील चौकांच्या सुशोभीकरणासंदर्भात नुकतीच महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यात शहरातील विविध चौक सुशोभिकरणासाठी घेतलेल्या एजन्सी, बँक, व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी चौक सुशोभिकरणाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र सुशोभिकरणानंतर देखील जाहिरातदार सुशोभिकरणावर जाहिरात, पोस्टर, बॅनर लावून विद्रुपीकरण करतात. हा प्रकार थांबविण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये संबंधितांवर कारवाई करावी, अशी सूचना महापौर नितीन ल‹ा यांनी आयुक्तांना केली आहे.

Web Title: Municipal Corporation to take action against insurgents: Letter to Commissioner of the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.