मनपा अर्थसंकल्प- भाग ६
By Admin | Updated: February 21, 2015 00:49 IST2015-02-21T00:49:53+5:302015-02-21T00:49:53+5:30

मनपा अर्थसंकल्प- भाग ६
>असा आहे अर्थसंकल्प- २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी पाणी वापर शुल्क वाढविण्याचा आढावा घेतला जाईल.- पाणी करात १५ टक्के वाढ अपेक्षित आहे.यासाठी १२५ कोटींचे लक्ष्य निश्चित केले आहे. - नवे बाजार, पार्किंग, हॉकर्स धोरण, परवाना शुल्क आदींद्वारे उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. - पेंच टप्पा ४ ची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. - नाग नदी व अन्य नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १२६ कोटी रुपयांचा बृहत् आराखडा तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. - मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग, अजनी रेल्वे स्टेशन, इतवारी रेल्वे स्टेशन, मस्कासाथ, जरीपटका इटारसी रेल्वे लाईनजवळ उड्डाण पुलाचे बांधकाम केले जाईल. - महाल येथील नगर भवन ३० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक केले जाईल.- धरमपेठ व हनुमाननगर या दोन झोनच्या कार्यालयांची पुनर्बाधणी करण्यासाठी २ कोटींची तरतूद.