पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांनी घेतले मुंडेचे अंत्यदर्शन

By Admin | Updated: June 3, 2014 18:22 IST2014-06-03T13:51:08+5:302014-06-03T18:22:41+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील भाजपाच्या प्रमुख कार्यालयात गोपीनाथ मुंडेचे अंत्यदर्शन घेतले

Munde's funeral with the Prime Minister and veteran leaders | पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांनी घेतले मुंडेचे अंत्यदर्शन

पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांनी घेतले मुंडेचे अंत्यदर्शन

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३ -  पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील भाजपाच्या प्रमुख कार्यालयात गोपीनाथ मुंडेचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी मुंडे यांच्या कन्या पंकजा यांचे सांत्वन केले. मुंडे (वय ६५) यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत अपघाती निधन झाले. दुपारी भाजपाच्या मुख्य कार्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व बसप प्रमुख मुलायम सिंग यादव यांनीही मुंडेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
लालकृष्ण आडवाणी, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, व्यंकैय्या नायडू, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, वसुंधरा राजे या भाजप नेत्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडेच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दरम्यान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मुंडेच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्यातर्फे भाजपा मुख्यालयात पुष्पचक्र पाठवण्यात आले. 
 
मान्यवर नेत्यांच्या प्रतिक्रिया
 
मुंडे हे खरे लोकनेते होते. त्यांच्या निधनाने देशाचे व मोठे नुकसान झाले आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 
मुंडेच्या निधनाने राज्याने उद्योन्मुख नेतृत्व गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
 
मुंडेच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. महाराष्ट्राने एक मोठा लोकनेता गमावला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार
 
गोपीनाथ मुंडेंचे निधन राज्यासाठी धक्कादायक. - मनसे अध्यक्ष राज ठाकरे
 
मुंडे नाहीत यावर अजून विश्वास बसत नाही. वृत्तपत्रांमधून टीका झाल्यावरही ते कधी व्यथीत व्हायचे नाही. मुंडेंचे अकाली निधन हे केवळ भाजपचीच हानी नसून संपूर्ण राज्याची हानी. - शिवसेना खासदार संजय राऊत 
 
मुंडेच्या सावलीखाली आम्ही वावरलो. त्यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध होते.  त्यांच्या निधनामुळे आमचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.  - अभिनेता रितेश देशमुख. 
 

Web Title: Munde's funeral with the Prime Minister and veteran leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.