मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी संथगतीने
By Admin | Updated: August 28, 2014 03:04 IST2014-08-28T03:04:37+5:302014-08-28T03:04:37+5:30
केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा ३ जूनला रस्ता अपघात झालेल्या मृत्यूचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) तपास कासव गतीने सुरू आहे

मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी संथगतीने
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा ३ जूनला रस्ता अपघात झालेल्या मृत्यूचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) तपास कासव गतीने सुरू आहे. सीबीआयने चौकशी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेली नसल्याचे म्हटले आहे.
या घटनेमागे घातपात असल्याचा आरोप करून भाजपा नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर या अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली होती. सीबीआय चौकशीची मागणी सर्वांतआधी भाजपा नेते आणि विधान परिषद सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी केली होती. त्यानंतर वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली होती. त्यानंतर गृह मंत्रालयाने सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले होते. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि आरपीआय (ए) नेते रामदास आठवले यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा कार्यकर्ते आणि इतरांच्या भावनांचा आदर केला जावा आणि या घटनेतील गूढ उकलण्यात आले पाहिजे, असे ते म्हणाले होते.