मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी

By Admin | Updated: June 3, 2014 16:39 IST2014-06-03T15:56:44+5:302014-06-03T16:39:12+5:30

मुंडे- महाजन कुटुंबियांसाठी महिन्याचा तिसरा दिवस हा अनलकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंडे-महाजन कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींचा महिन्याच्या तिस-या दिवशीच मृत्यू झाला आहे.

Munde - 3 figure for Mahajan families, unlucky | मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी

मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ३ - मुंडे- महाजन कुटुंबियांसाठी महिन्याचा तिसरा दिवस हा अनलकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंडे-महाजन कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींचा महिन्याच्या तिस-या दिवशीच मृत्यू झाला आहे. आज (३ जून)  गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर मुंडे- महाजन कुटुंबियांच्या या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी हा दुर्दैवी योगायोग लक्षात आणून दिला आहे.
आठ वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मे २००६ रोजी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाले. प्रमोद महाजन यांच्या सख्ख्या धाकट्या भावानेच त्यांना गोळ्या घातल्या होत्या. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३ मे रोजी प्रमोद महाजनांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेताल. या दुर्दैवी घटनेच्या अवघ्या महिन्याभरानंतर म्हणजेच ३ जून २००६ रोजी प्रमोद महाजन यांचे खासगी सचीव विवेक मोईत्रा यांचा मृत्यू झाला होता तर महाजन यांचा मुलगा राहुल अंमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे बेशुद्धावस्थेत आढळला होता.
प्रमोद महाजन यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्यांच्या लहान भावाचा प्रवीण महाजन यांचा मृत्यूही महिन्याच्या ३ तारखेला व्हावा हा आणखी एक दुर्दैवी योगायोग. महाजनांच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असणा-या प्रवीण महाजन यांचे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ब्रेन हॅम्ब्रेजमुळे ३ मार्च २०१० मध्ये  निधन झाले. तर प्रमोद महाजन यांच्या बहिणीचे पती गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी (३ जून) दिल्लीत अपघाती निधन झाले. 
मुंडेच्या निधनाचे वृत्त कळताच सारंगी महाजन यांना अतिशय मोठा धक्का बसला आहे. प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांची गोळ्या जाडून हत्या केल्यानतंर या दोन भावंडांच्या कुटुंबियांमध्ये एक दरी निर्माण झाली होती. ती कधीतरी भरून निघेल असा विश्वास सारंगी यांना होता. मात्र मुंडेच्या निधनामुळे आता हे अशक्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर मुंडे यांनीही सारंगी यांच्याशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत. सारंगी यांनी अथक प्रयत्न करूनही त्यांचा कधीच मुंडेशी संपर्क होऊ शकला नाही. लोकसभा निवडणुकीतील विजयनातंरही सारंगी यांनी मुंडे व प्रमोद महाजन यांची कन्या पूनम यांचे अभिनंदन करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. दरम्यान मुंडे यांच्या अंत्यसंस्कारांसाठी आपण त्यांच्या गावी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Web Title: Munde - 3 figure for Mahajan families, unlucky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.