शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर मुंबईला मिळाला सर्वाधिक खड्ड्यांच्या शहराचा 'मान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 16:57 IST

रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार विभागाचे सचिव नवीन लाडे यांनी खड्डे मोजण्याचा अनोखा उपक्रम राबवला होता.

मुंबई- पावसाळ्यात मुंबईत जागोजागी खड्डेचखड्डे असतात. त्यामुळे वाहन चालकांसह सामान्यांना या खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागतो. या खड्ड्यांना वैतागूनच रिपब्लिकन पक्षाच्या रोजगार विभागाचे सचिव नवीन लाडे यांनी खड्डे मोजण्याचा अनोखा उपक्रम राबवला होता. त्यांच्या या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं नोंद घेतली आहे. नवीन लाडे यांना सुवर्णाक्षरांत कोरलेलं प्रमाणपत्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून देण्यात आलं आहे. परंतु त्यांनी मुंबई शहर खड्डेमय असल्याचा केलेला दावा गिनीज बुकसह लिम्का बुकनं फेटाळून लावला आहे. नवीन लाडे आणि त्यांच्या टीमला मुंबई शहरात 26 हजार 934 खड्डे आढळले होते. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून त्यांच्याकडून खड्ड्यांची मोजणी सुरू होती. शहरातील किमान 20 हजार खड्डे शोधण्याचा लाडे यांचा प्रयत्न होता. मात्र प्रत्यक्षात त्यांना शहरात त्यापेक्षा जास्त खड्डे आढळून आले होते. यानंतर त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्याशी संपर्क साधला होता. सर्वाधिक खड्डे असलेलं शहर असा विक्रम मुंबईच्या नावे नोंदला जावा, यासाठी लाडे प्रयत्नशील होते.गिनीज बुक ऑफ रेकॉड्सकडून लाडे यांना फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. लाडे यांचा प्रयत्न राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉड्सच्या प्रशासनानं म्हटलं आहे. इतर शहरांमधील खड्ड्यांची आकडेवारी नसल्यानं मुंबईला हा 'मान' कसा द्यायचा, असाही प्रश्न गिनीज बुक ऑफ रेकॉर्डकडून विचारण्यात आला होता. तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनं अशा कोणत्या प्रकारची वर्गवारी करणाचा विभाग आमच्याकडे नसल्याचं कारण दिलं आहे. एकाच खड्ड्याची नोंद दोनदा होऊ नये, यासाठी लाडे यांच्या टीमकडून खड्ड्यांचं जिओ टॅगिंगदेखील करण्यात आलं होतं. यासाठी 4 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. 

टॅग्स :Potholeखड्डे