शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पमध्ये मुंबईच्या महिलेचा मृत्यू, १५ दिवसांत ४ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 08:52 IST

काठमांडू : माउंट एव्हरेस्ट जिंकण्याच्या जिद्दीने महाराष्ट्रातील मुंबईच्या एका गिर्यारोहक महिलेचा जीव घेतला. ५९ वर्षीय सुझान लिओपोल्डिना जिझस यांना ...

काठमांडू : माउंट एव्हरेस्ट जिंकण्याच्या जिद्दीने महाराष्ट्रातील मुंबईच्या एका गिर्यारोहक महिलेचा जीव घेतला. ५९ वर्षीय सुझान लिओपोल्डिना जिझस यांना पेसमेकर बसवण्यात आला होता. पण या शारीरिक स्थितीसह त्यांना एव्हरेस्टवर चढाईचा विक्रम करायचा होता.

बेस कॅम्पपासून अवघे २५० मीटर अंतर चढण्यासाठी सुझान यांना १२ तास लागले. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना बळजबरीने लूकला रुग्णालयात नेल्यानंतर ६ दिवसांनी १८ मे रोजी त्यांना मृत्यू झाला.

ग्लेशियर हिमालय हायकिंग कंपनीच्या टेंडी शेर्पा यांनी सांगितले की, एव्हरेस्ट चढण्यापूर्वी सराव सत्रात सुझान यांना त्रास होऊ लागला होता. 

१५ दिवसांत ४ मृत्यू -एव्हरेस्टला जाणाऱ्या गिर्यारोहकाचा मृत्यू होण्याची ही गेल्या १५ दिवसांतील ही चौथी घटना आहे. मार्चमध्ये सुरू झालेल्या चालू हंगामात आतापर्यंत आठ चिनी आणि एका भारतीय गिर्यारोहकाचा एव्हरेस्टवर मृत्यू झाला आहे. 

- १८ मे रोजी दक्षिण शिखराजवळ गिर्यारोहण करताना अज्ञात चिनी गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. याच दिवशी मुंबईत राहणाऱ्या सुझान यांचे सहा दिवसांच्या आजारानंतर गुरुवारी सकाळी बेस कॅम्पमध्ये निधन झाले. - १७ मे रोजी आजारी पडून कॅम्प-४ मध्ये मोल्दोव्हा येथील व्हिक्टर ब्रिन्जा या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला.  

टॅग्स :NepalनेपाळDeathमृत्यूMumbaiमुंबई