मुंबई फिचर

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:14+5:302015-02-13T00:38:14+5:30

रेल्वे प्रकल्प अडले, विकासाचे गणित बिघडले

Mumbai feature | मुंबई फिचर

मुंबई फिचर

ल्वे प्रकल्प अडले, विकासाचे गणित बिघडले
निधीचा तुटवडा : विदर्भातील प्रकल्प दुर्लक्षितच
दयानंद पाईकराव
नागपूर : कुठल्याही भागात रेल्वेचे जाळे असले की त्या भागाचा आपोआप विकास होतो. शेती, उद्योगधंदे भरभराटीस येतात. परंतु विदर्भात सर्वदूर रेल्वेचे जाळेच नसल्यामुळे विदर्भाचा हवा तेवढा विकास अद्याप झालेला नाही. मागील पाच वर्षांपासून विदर्भासाठी घोषणा केलेले प्रकल्प अद्यापही रखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे विदर्भाच्या विकासाला खीळ बसल्याची स्थिती आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात दरवर्षी विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात येते. परंतु घोषणा केलेल्या प्रकल्पांना कासवगतीने निधीचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे या प्रकल्पांची किंमत दिवसेंदिवस वाढत जाऊन हे प्रकल्प रखडले जातात. विदर्भासाठी घोषित करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या बाबतीतही आजपर्यंत नेमके हेच घडले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भासाठी प्रकल्पांची घोषणा तर झाली. परंतु हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी हवी ती पावले न उचलल्या गेल्यामुळे हे प्रकल्प आजही अपूर्णच राहिले. दिवसेंदिवस या प्रकल्पांची किंमत वाढत असून प्रकल्प रखडल्यामुळे संबंधित भागाच्या विकासावर त्याचा विपरीत परीणाम झाला आहे.
...............
वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्प रखडला
तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी २००८-०९ च्या रेल्वे अर्थसंकल्पात वर्धा-यवतमाळ-नांदेड या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यावेळी २७० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची किंमत ६९७ कोटी रुपये होती. यवतमाळ येथे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी प्रकल्पाचा शिलान्यास केला. या प्रकल्पासाठी २००९-१० मध्ये १५ कोटी, २०१०-११ मध्ये ४० कोटी, २०११-१२ मध्ये ४० कोटी, २०१२-१३ मध्ये १५ कोटी अशा पद्धतीने निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे हा प्रकल्प गती घेऊ शकला नाही. सध्या राज्य शासनाच्या सहकार्याने या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे. मागील सहा वर्षात वर्धा ते यवतमाळ दरम्यान फक्त ३३ किलोमीटर जमीन अधिग्रहित करण्यात आली. प्रकल्पाची किंमतही ६९७ कोटींवरून १६०० कोटींवर पोहोचली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या भागात रेल्वेचे जाळे पसरल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाला देशभरात रेल्वेच्या माध्यमातून बाजारपेठ मिळून त्यांचा विकास होणार आहे. या प्रकल्पासाठी खासदार विजय दर्डा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

Web Title: Mumbai feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.