शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

मृत्यूचा थरार! 153 विमान प्रवाशी, 5 मिनिटे पुरेल इतका इंधनसाठा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 10:52 IST

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला

लखनऊ -  मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या विस्तारा विमानातील इंधन संपुष्टात आल्याने 153 प्रवाशांचे जीव टांगणीला लागले होते. जवळपास 4 तास हे विमान हवेत उड्डाण घेत असल्याने इंधन टाकीत फक्त पाच मिनिटं पुरेल इतकं इंधन असल्याने या विमानाचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मुंबईहूनदिल्लीला जाणारं हे विमान पहिल्यांदा लखनऊ येथे वळविण्यात आलं. त्यानंतर या विमानाला प्रयागराजला पाठविण्यात आलं. लखनऊवरुन प्रयागराजला गेल्यानंतर पुन्हा विमानाला लखनऊला बोलविण्यात आलं. अंधूक प्रकाशामुळे विमानाच्या लँडिंगला अडचण निर्माण झाली होती. अखेर पायलटने इमरजेन्सी संदेश पाठवल्यानंतर विमानाला लखनऊ येथील विमानतळावर उतरविण्यात आलं त्यावेळी विमानातील इंधन जवळपास संपलेले होतं. 

चांगले हवामान आणि लखनऊ विमान वाहतूक नियंत्रण कक्षाच्या प्रसंगावधनामुळे या विमानाचा मोठा अपघात टळला. लखनऊ ते प्रयागराज येथील बमरौली विमानतळ जवळपास 200 किमी अंतरावर आहे. हे अंतर पार करण्यासाठी विमानात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध नव्हता. प्रयागराजच्या मार्गावर सात किमी गेल्यानंतर या विमानाला पुन्हा लखनऊला बोलविण्यात आलं. जेथे 20 मिनिटांच्या कालावधीत या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. 

 

विमानाला पुन्हा लखनऊला आणण्याबाबत पायलटला विमान वाहतूक नियंत्रण कक्षाने कळविलं. लखनऊ येथील वातावरण चांगले झाले असून विमान लखनऊला उतरवू शकता. त्यानंतर पायलटने विमान लखनऊला वळविले. जेव्हा विमानाचं लखनऊला लँडिंग झालं तेव्हा विमानात 200 किलोग्रॅम म्हणजे 5 मिनिटे उड्डाण होईल इतकं इंधन शिल्लक होतं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ए 320 UK 944  हे विमान मुंबईहून दुपारी 2.40 वाजता 8, 500 किलो इंधनासह दिल्लीसाठी रवाना झाली. मुंबई ते दिल्ली यातील विमान प्रवासाचं अंतर दोन तासाचं आहे. या प्रकरणावर विमान प्राधिकरणाने चौकशीचे आदेश दिले आहेत. एका ज्येष्ठ पायलटने या घटनेवर सांगितले की, हा एक चमत्कार आहे विमान लँडिंग होणं. विमानातील इंधनसाठा कमी असताना लखनऊवरुन विमान पुन्हा प्रयागराज वळविण्यात आलं ही भयंकर मोठी चूक आहे. दिल्लीत खराब वातावरण आणि अंधूक प्रकाशामुळे जवळपास 75 मिनिटं हे विमान हवेत घिरक्या घेत होतं. त्यानंतर पायलटने लखनऊ विमानतळावर विमान वळविण्याचा निर्णय घेतला होता.  

टॅग्स :Mumbaiमुंबईdelhiदिल्ली