शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-दिल्ली जगातील व्यस्त हवाई मार्गांच्या यादीत; ४.८ लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 08:35 IST

हवाई वाहतुकीचे मानांकन करणाऱ्या ब्रिटनस्थित ‘’ओएजी’’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबई-दिल्ली मार्गाने जगातील सर्वात व्यस्त हवाई मार्गांच्या यादीत स्थान मिळविले आहे. कोरोना काळात एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्राचे चाक खोलात असताना, ही सुवार्ता समोर आल्याने आशेचा किरण दिसत आहे.हवाई वाहतुकीचे मानांकन करणाऱ्या ब्रिटनस्थित ‘’ओएजी’’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सर्वात व्यस्त देशांतर्गत हवाई मार्गांच्या क्रमवारीत मुंबई-दिल्ली मार्गाला दहावे स्थान प्राप्त झाले आहे. कोरोना काळात हा एकमेव मार्ग विमान कंपन्यांसाठी तारणहार ठरला. चालू महिन्यात मुंबई-दिल्ली मार्गावरून तब्बल ४.८ लाख प्रवाशांनी ये-जा केली.अहवालानुसार, भारतात दिल्ली विमानतळाने सर्वाधिक प्रवासी हाताळले. त्यामुळे जगभरातील व्यस्त विमानतळांच्या यादीत दिल्लीला दहावे स्थान प्राप्त झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात २७८.४ लाख प्रवाशांनी येथून प्रवास केला आहे. २०१९ मध्ये दिल्लीचे स्थान या यादीत १४ वे होते.  भारतातून आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडणाऱ्या एकाही मार्गाला या यादीत स्थान मिळालेले नाही. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवर गेल्या दीड वर्षांपासून लागू असलेल्या निर्बंधांचा हा परिणाम असल्याचे हवाई वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे.