IGI Airport Full Emergency: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानात मंगळवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्यानंतर दिल्ली विमानतळावर एकच खळबळ उडाली. या विमानात सुमारे २०० प्रवासी आणि कर्मचारी होते. दिल्ली विमानतळावर संपूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो विमान क्रमांक 6E-762 (एअरबस A321 निओ) मध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. सुरक्षा यंत्रणांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली.
फ्लाइट रडार २४ नुसार, हे विमान सकाळी ७.५३ वाजता नियोजित वेळेनुसार सुरक्षितपणे दिल्लीत उतरले. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमानाची कसून तपासणी सुरू करण्यात आली. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली. या प्रकरणावर इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकृत निवेदनाची सध्या प्रतीक्षा आहे.
Web Summary : A bomb threat on an IndiGo flight from Mumbai caused a full emergency at Delhi Airport. All 200 passengers and crew were safely evacuated after landing. A thorough search found no explosives, and security measures were heightened. An official statement from IndiGo is awaited.
Web Summary : मुंबई से दिल्ली जा रही इंडिगो की उड़ान में बम की धमकी के बाद दिल्ली एयरपोर्ट पर आपातकाल घोषित कर दिया गया। 200 यात्रियों और चालक दल को सुरक्षित निकाला गया। तलाशी में कोई विस्फोटक नहीं मिला, सुरक्षा बढ़ाई गई। इंडिगो के आधिकारिक बयान का इंतजार है।