मोदींकडे मुंबई क्लब...
By Admin | Updated: May 17, 2014 03:35 IST2014-05-17T03:35:01+5:302014-05-17T03:35:01+5:30
मोदींकडे मुंबई क्लब असेल, असे भाजपाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे.

मोदींकडे मुंबई क्लब...
नवी दिल्ली : मोदींकडे मुंबई क्लब असेल, असे भाजपाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी लोकमतला सांगितले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे खास निकटस्थ माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी, पक्षाचे कोषाध्यक्ष खा. पियूष गोयल, शिवसेना नेते सुरेश प्रभू यांचा मुंबई क्लबमध्ये समावेश असेल. गोयल आणि प्रभू हे मोदींचे विश्वासू मानले जातात. भाजपा आणि संघातील मतभेद दूर करण्यासाठी सेतू म्हणून गडकरी काम करतील. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री म्हणून गोयल यांचा समावेश करण्याचे संकेतही मिळाले आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे शिवसेनेसारख्या पक्षांना पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नाही. महाराष्टÑातील विधानसभा डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची साथ हवी आहे. भाजपेतर सरकार अडचणीत येण्याची शक्यता असलेल्या हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार या राज्यांचीही काळजी घ्यावी लागेल. या बाबींवर दोन दिवसांत चर्चा होऊ शकते.