शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ठरली कुबेरांची वस्ती; देशातील सर्वात श्रीमंत मायानगरी, दिल्ली दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:36 IST

हारून इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून, यातील प्रमुख मुद्दे विचारात घेता देशभरात ४.१२ लाख कोट्यधीश आहेत. मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमंतांची संख्या अधिक असून, देशातील कोट्यधीश गुंतवणुकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर मार्केटला प्राधान्य देत आहेत.

मुंबई: कोरोना विषाणूने कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे आश्चर्यचकित करणारा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. त्यानुसार देशात सर्वाधिक श्रीमंत कुटुंबे देशाची आर्थिक राजधानी आणि मायानगरी अशी ओळख असलेल्या मुंबईत आणि महाराष्ट्रात वास्तव्य करीत असून, देशाची राजधानी दिल्ली मात्र कुबेरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हारून इंडिया वेल्थ रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला असून, यातील प्रमुख मुद्दे विचारात घेता देशभरात ४.१२ लाख कोट्यधीश आहेत. मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या श्रीमंतांची संख्या अधिक असून, देशातील कोट्यधीश गुंतवणुकीसाठी गृहनिर्माण क्षेत्र आणि शेअर मार्केटला प्राधान्य देत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ही दोन्ही क्षेत्रे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानली जात नसली तरीही येथे गुंतवणुकीस प्राधान्य दिले जात आहे. देशभरातील ७०.३ टक्के श्रीमंत दहा राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत. श्रीमंतांच्या यादीत मुंबई आणि दिल्ली ही दोन शहरे एका खालोखाल आहेत. राज्याचा विचार करता ५६ हजार कोट्यधीशांमुळे महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर असून, येथील श्रीमंतांची संख्या ३६ हजार आहे. तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे; येथील श्रीमंतांचा आकडा ३५ हजार आहे. कर्नाटक चौथ्या स्थानावर असून, येथील श्रीमंतांचा आकडा ३३ हजार आहे. तर गुजरात पाचवा स्थानी असून, येथे २९ हजार श्रीमंत आहेत.  आर्थिक विकास दर हा मुद्दा लक्षात घेता विविध राज्ये आणि शहरांतील श्रीमंत हे आर्थिक विकास दरात योगदान देत आहेत. आकडेवारीनुसार, मुंबईमधील १६ हजार ९३३ श्रीमंत कुटुंबे देशाच्या आर्थिक विकास दरात ६.१६ टक्के एवढा वाटा उचलत आहेत. दिल्ली येथील १६ हजार कुटुंबांचा हाच वाटा ४.९४ एवढा आहे. याच श्रीमंत वर्गामुळे ब्रँडेड साहित्याचा बाजार तेजीत आहे. श्रीमंतांकडील वाहनांच्या ताफ्याचा विचार केल्यास मर्सिडीज त्यांची आवडती कार असून, याखालोखाल बीएमडब्ल्यू आणि जग्वार या दोन गाड्यांना श्रीमंतांची पसंती मिळत आहे. स्पोर्ट्स कार खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. रोलेक्स हे श्रीमंतांचे आवडते घड्याळ असून, सोन्याचा विचार करता तनिष्क यास श्रीमंत अधिक प्राधान्य देत आहेत. त्यांच्या आवडत्या हॉटेलांच्या यादीत ताज पहिल्या स्थानी आहे. हा श्रीमंत वर्ग एचडीएफसी, आयसीआयसीआय या दोन बँकांकडे आकर्षित होत असून विम्याचा विचार करता त्यांच्याकडून एलआयसी या कंपनीस प्राधान्य दिले जात आहे. अहवालानुसार इमिरात, सिंगापूर आणि एतीहात या विमान कंपन्यांना ते प्रवासासाठी जास्त प्राधान्य देतात.

राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानीश्रीमंतांच्या यादीत शहरांत मुंबई तर राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत १६ हजार ९३३ श्रीमंत कुटुंबे असून ५६ हजार कोट्यधीशांमुळे श्रीमंत कुटुंबांमध्ये देशातील सर्व राज्यांत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

देशाच्या आर्थिक विकास दरात १६,९३३ मुंबईतील कुटुंबे ६.१६ टक्के वाटा उचलत आहेत. १६,००० दिल्लीतील कुटुंबे ४.९४ टक्के वाटा उचलत आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबईdelhiदिल्लीMONEYपैसा