मुंबईवरील हल्ल्याची चर्चा झाली - पाकिस्तान
By Admin | Updated: May 28, 2014 13:33 IST2014-05-28T13:33:33+5:302014-05-28T13:33:46+5:30
ही बैठक म्हणजे केवळ फोटो आपॉर्ट्युनिटी नव्हती तर धोरणात्मक प्रगतीच्या दृष्टीने ही बैठक झाल्याचे शरीफ यांच्या सल्लागाराने सांगितले.

मुंबईवरील हल्ल्याची चर्चा झाली - पाकिस्तान
>ऑनलाइन टीम
इस्लामाबाद, दि. २८ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भारत भेट अपेक्षेपेक्षा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया शरीफ यांचे सल्लागार सतराझ अझिज यांनी दिली आहे. बुधवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानात सुरू असलेल्या खटल्याला गती द्यावी अशी मागणी मोदींनी केल्याचे मान्य केले. गेल्याच वर्षी विशेष आयोगाची स्थापना करण्यात आल्याचे व न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्याचे अझिझ म्हणाले. शांतता प्रक्रियेसाठी भारत व पाक या दोन्ही देशांमध्ये सतत बोलणी होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
मुंबईवरील हल्ला, समझोता एक्स्प्रेसव बाँबस्फोट यांसह दहशतवादासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये बोलणी झाल्याचे अझिझ म्हणाले. ही बैठक म्हणजे केवळ फोटो आपॉर्ट्युनिटी नव्हती तर धोरणात्मक प्रगतीच्या दृष्टीने ही बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील लोकांचा संपर्क वाढायला हवा या दृष्टीने व्हिसा देण्याबाबत निर्णय व्हायला हवीत अशी चर्चाही दोन्ही देशांमध्ये झाली.