समुद्राच्या पोटातून जाणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
By Admin | Updated: April 20, 2016 20:03 IST2016-04-20T18:04:01+5:302016-04-20T20:03:43+5:30
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन खोल समुद्राच्या 21 किलोमीटर पोटातून जाणार आहे.

समुद्राच्या पोटातून जाणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 20- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेननं प्रवास करणा-यांना एका वेगळ्याच थराराची अनुभूती घेता येणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन 21 किलोमीटरचं अंतर खोल समुद्राच्या पोटातून पार करणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन दोन तासांत 508 किलोमीटरच्या प्रवासाचा पल्ला गाठणार आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मालवाहतूक करण्याचा विचार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या बुलेट ट्रेनचा कॉरिडोर उंच ट्रॅकवर असावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. ही बुलेट ट्रेन ठाण्याच्या खाडीपासून ते विरारपर्यंत खोल समुद्राच्या आतून जाणार आहे, अशी माहिती जपान इंटरनॅशनल कूपर एजन्सी (JICA) यांनी दिली आहे.
याआधी इंग्लंडनं 1994ला खोल समुद्राच्या आतून बुलेट ट्रेन सुरू केली. इंग्लंडमधील ही हायस्पीड बुलेट ट्रेन लंडन ते पॅरिसपर्यंतचे 300 किलोमीटरचं अंतर खोल समुद्रातून पार करते. लंडन ते पॅरिस असा प्रवासाचा 300 किलोमीटरचा टप्पा ही बुलेट ट्रेन अवघ्या 2 तास 15 मिनिटांत कापते. या बुलेट ट्रेनचा प्रतितास 160 किलोमीटर इतका स्पीड आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर जवळपास 97,636 कोटी खर्च अपेक्षित आहे. या बुलेट ट्रेनसाठी 81 टक्के निधी जपान देणार आहे. 2018च्या शेवटाला या बुलेट ट्रेनच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. या बुलेट ट्रेनचा प्रतितास वेग 350 जास्तीस जास्त, तर 320 कमीत कमी असणार आहे.