मुलायम सिंहांचा पंतप्रधानांसोबतच्या 'कान की बात'चा खुलासा
By Admin | Updated: March 21, 2017 11:02 IST2017-03-21T09:37:18+5:302017-03-21T11:02:34+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांमध्ये झालेल्या गळाभेटीवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

मुलायम सिंहांचा पंतप्रधानांसोबतच्या 'कान की बात'चा खुलासा
ऑनलाइन लोकमत
मोदी-मुलायम यांची गळाभेट; गुजगोष्टी
लखनऊच्या कांशीराम स्मृती उपवन मैदानावर रविवारी सकाळी उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या सहकारी मंत्रिमंडळाचा तासभर चाललेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची झालेली गळाभेट हे मोठे आकर्षण ठरले.
सर्व मंत्र्यांच्या शपथविधी पार पडल्यावर पंतप्रधान मोदी उठून तेथून बाहेर निघणार तेवढ्यात मुलायम सिंह यांनी त्यांना थांबवले व मोदीही थांबले. दोघांनी परस्परांना आलिंगन दिले. एवढेच नव्हे तर मुलायम सिंह पंतप्रधानांच्या कानात काही तरी पुटपुटत असल्याचे दिसले व मोदींनीही मान हलवून त्यांच्या म्हणण्यास होकार दिल्याचे दिसले. नंतर मोदी बाजूला उभ्या असलेल्या अखिलेश यादव यांच्याकडे वळले व त्यांनी अखिलेशच्या पाठीवर हलकीशी थापही मारली. मुलायम-मोदी यांच्यातील गुजगोष्टीचा खुलासा 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्रातून अखेर समोर आला आहे.