आघाडीसाठी मुलायमसिंह यादव फोनवरुन रडले ?
By Admin | Updated: February 3, 2017 16:22 IST2017-02-03T16:22:17+5:302017-02-03T16:22:17+5:30
समाजवादी पक्षाने आघाडी केली नाही म्हणून राष्ट्रीय लोक दल कमकुवत होणार नाही असे आरएलडीचे सरचिटणीस जयंत चौधरी यांनी सांगितले.

आघाडीसाठी मुलायमसिंह यादव फोनवरुन रडले ?
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 3 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आघाडी केली नाही म्हणून राष्ट्रीय लोक दल कमकुवत होणार नाही असे आरएलडीचे सरचिटणीस जयंत चौधरी यांनी सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. आरएलडी आणि सपामध्ये आघाडी व्हावी यासाठी मुलायमसिंह यादव यांनी अजित सिंहांना फोन केला.
त्यावेळी मुलायमसिंह रडले म्हणून आम्ही आघाडीसाठी तयार झालो असा दावा जयंत चौधरी यांनी केला. मथुरा येथील आरएलडी उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. तुमचा मित्र रडला आणि मदत मागत असेल तर, तुम्ही मदत करणार नाही का ? अजित सिंह काही चुकीचे वागले नाही. मुलायमसिंह यादव फोनवरुन रडत होते आणि मदत मागत होते त्यामुळे अजित सिंहानी दोन मिनिटात निर्णय घेतला असा दावा जयंत चौधरी यांनी केला.
जाहीरातबाजीला विकास म्हणत नाही असे टोला त्यांनी अखिलेश यादव यांना लगावला. अखिलेश यादवना कुटुंबियांबरोबर भांडण्याची सवय झाली आहे असे ते म्हणाले.