मुकुल रॉय यांचा बंडाचा झेंडा

By Admin | Updated: January 21, 2015 01:35 IST2015-01-21T01:35:01+5:302015-01-21T01:35:01+5:30

खासदार मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ राज्यसभेतच नव्हे प. बंगालमध्येही फूट पाडण्याची योजना आखली असून बंडखोराचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.

Mukul Roy's revolting flag | मुकुल रॉय यांचा बंडाचा झेंडा

मुकुल रॉय यांचा बंडाचा झेंडा

हरीश गुप्ता - नवी दिल्ली
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खास निकटस्थ शारदा घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले खासदार मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये केवळ राज्यसभेतच नव्हे प. बंगालमध्येही फूट पाडण्याची योजना आखली असून बंडखोराचे नेतृत्व करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.
राज्यसभेत तृणमूलचे १२ खासदार असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त खासदार ममता बॅनर्र्जींवर नाराज आहेत. शारदा चिटफंड घोटाळ्यातील सहभागाबद्दल सध्या कारागृहात असलेले खा. कुणाल घोष, सुखेंदू रॉय असो की प्रो.जोगेन चौधरी हे सर्व जण ममता ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे त्यावर नाराज आहेत. मुस्लीम खासदारही एकदम खपा आहेत.हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कामकाजाचा खोळंबा केल्यामुळे भाजपचे नेतृत्व चिंतित असले तरी या कथित प्रस्तावावर सावधगिरीचे पाऊल उचलत आहे. रॉय यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अरुण जेटली, रा.स्व. संघाचे नेते सुरेश सोनी, रामलाल आणि अन्य नेत्यांची व्यक्तिश: भेट घेतली.
पडद्यामागे हालचाली
प. बंगालमध्ये २०१६ मध्ये विधानसभा निवडणुका असून अमित शहा यांनी या राज्यात वारंवार चकरा पाहता पडद्यामागे खूप काही घडत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

बदल्यात हवे संरक्षण
रॉय यांनी ममता बॅनर्जी यांचे पितळ उघडे पाडण्याच्या बदल्यात संरक्षणाची मागणी केली आहे. आश्चर्य म्हणजे संपुआच्या कारकीर्दीत रॉय यांना हटवून ज्यांना रेल्वेमंत्री बनविले गेले ते लोकसभेतील खा. दिनेश त्रिवेदी यांनीही रॉय यांच्या बंडाला समर्थन दिले आहे. लोकसभेत तृणमूलचे ३३ खासदार असल्यामुळे फुटीचे राजकारण शिजवणे अवघड जाईल मात्र राज्यसभेतील १२ पैकी ६ खासदारांनी याआधीच ममतांविरुद्ध बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे या सभागृहात काम सहज होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेत पक्षात उभी फूट पाडण्यासाठी आणखी दोन खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
सीबीआय चौकशीमुळे व्यथित
शारदा घोटाळ्यात सीबीआयने समन्स पाठविल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेमुळे
रॉय हे दुखावले गेले असून मी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी सर्व काही केले असताना माझा बचाव करण्याऐवजी त्यांनी माझ्यापासून अंतर राखत माझ्यावर खापर फोडले आहे, असे रॉय यांनी भाजपच्या नेतृत्वाला कळविले असल्याचे समजते.

च्शहा यांना सर्वप्रथम तृणमूलमध्ये फूट पाडायची असून त्यानंतरच रालोआमध्ये या नेत्यांना प्रवेश देण्यावर ते विचार करतील.

Web Title: Mukul Roy's revolting flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.