शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बंगालमध्ये दिदींचा खेला! भाजपला मोठा झटका? बडा नेता घरवापसीच्या तयारीत; घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 13:38 IST

भाजपचा बडा नेता पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता; आज संध्याकाळी ममता बॅनर्जींना भेटणार

कोलकाता: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील मोठ्या पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय, त्यांचा मुलगा सुभ्रांशु रॉय तृणमूलमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्था एएनआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुकूल रॉय आज संध्याकाळी ममता बॅनर्जींची पक्ष मुख्यालयात भेट घेतील. या बैठकीला अभिषेक बॅनर्जीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलला मोठी गळती लागली होती. अनेक आमदारांनी हाती कमळ घेतलं. मात्र तरीही तृणमूलनं २०० हून अधिक जागा जिंकत राज्यात हॅटट्रिक साधली. भाजपमध्ये सत्तेच्या आशेनं गेलेल्या नेत्यांची आता चलबिचल सुरू झाली आहे. अनेक नेते तृणमूलमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये मुकूल रॉय यांचा क्रमांक वरचा आहे. मुकूल रॉय यांनी सप्टेंबर २०१७ मध्ये तृणमूलला रामराम केला होता. मात्र आता ते तृणमूलमध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात.निवडणुका संपल्यानंतरही ममता बॅनर्जी यांची नवी 'खेळी'; 'खेला होबे' स्कीम सुरूपक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत तृणमूलच्या नेतृत्त्वानं मुकूल रॉय यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं होतं. यानंतर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र निवडणुकीच्या तोंडावर तृणमूलमधून भाजपमध्ये आलेल्या सुवेंदू अधिकारी यांना पक्षात अधिक महत्त्व दिलं जात असल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.बंगालमध्ये लवकरच राजकीय भूकंप?; भाजपच्या गोटात खळबळ, दिदींनी वाढवलं टेन्शनमुकूल रॉय सध्या कृष्ण नगर मतदारसंघाचे आमदार आहेत. तृणमूलमध्ये असताना मुकूल रॉय ममता बॅनर्जींचे अतिशय निकटवर्तीय साथीदार होते. पक्षात त्यांना दुसऱ्या क्रमांकाचं स्थान होतं. त्यामुळेच तृणमूलला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपनं त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मुकूल रॉय यांच्या पत्नीची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. ममता बॅनर्जींनी विविध माध्यमांतून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा