मुकुल रॉय सीबीआय कार्यालयात हजर
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:40+5:302015-01-30T21:11:40+5:30
कोलकाता-तृणमूल काँग्रेसचे महासचिव मुकुल रॉय शारदा घोटाळा प्रकरणी चौकशीकरिता शुक्रवारी सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले. माजी रेल्वेमंत्री जेव्हा सीजीओ कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचले तेव्हा त्यांना सुरक्षा कर्मचारी व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरल्याने त्याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुकुल रॉय सीबीआय कार्यालयात हजर
क लकाता-तृणमूल काँग्रेसचे महासचिव मुकुल रॉय शारदा घोटाळा प्रकरणी चौकशीकरिता शुक्रवारी सीबीआयच्या कार्यालयात हजर झाले. माजी रेल्वेमंत्री जेव्हा सीजीओ कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहचले तेव्हा त्यांना सुरक्षा कर्मचारी व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरल्याने त्याठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.यावेळी बोलताना रॉय यांनी, सीबीआयला तपास कामात मदत करण्यासाठी आपण येथे पोहचलो असल्याचे म्हटले. माझ्याकडून वा पक्षातर्फे कोणतीही चूक घडली नसल्यावर त्यांनी पुन्हा एकदा यावेळी री ओढली.