मुकुल रोहटगी नवे अ‍ॅटर्नी जनरल

By Admin | Updated: May 29, 2014 03:06 IST2014-05-29T03:06:31+5:302014-05-29T03:06:31+5:30

दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल होणार

Mukul Rohatgi, the new attorney general | मुकुल रोहटगी नवे अ‍ॅटर्नी जनरल

मुकुल रोहटगी नवे अ‍ॅटर्नी जनरल

नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल होणार, हे बुधवारी स्पष्ट झाले. रोहटगी देशाचे चौदावे अ‍ॅटर्नी जनरल असतील. अ‍ॅटर्नी जनरल हे संवैधानिक पद असून ते भारताचे सर्वोच्च विधी अधिकारी असतात. संसदेचे सदस्य नसूनही संसदेच्या कामकाजात भाग घेऊन आपले मत मांडण्याचा त्यांना अधिकार असतो. सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या पाच ज्येष्ठ वकिलांमध्ये नाव घेतले जाणारे व देशातील सर्वात महागड्या वकिलांमध्ये समावेश असलेल्या रोहटगी यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला सांगितले की, भारत सरकारने मला अ‍ॅटर्नी जनरल होण्याचा प्रस्ताव दिला असून मी त्यास संमती दिली आहे. मात्र, मी संमती दिली असली तरी या नियुक्तीची अधिकृत घोषणा व्हायला हवी, असे त्यांनी सांगितले. बख्खळ पैसा मिळवून देणारी खासगी वकिली सोडून हे सरकारी पद स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना रोहटगी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, मी आज जे काही आहे, ते केवळ वकिली व्यवसायामुळेच आहे. त्यामुळे (हे पद स्वीकारून) देशाच्या व व्यवसायाच्या ऋणातून उतराई होता येत असेल तर पैशांंचा मुद्दा गौण आहे.

Web Title: Mukul Rohatgi, the new attorney general

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.