शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शंकराची पूजा केलीत, आता अल्लाहला काय उत्तर द्याल; उलेमाचा नक्वींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:10 IST

हिंदुंनी नमाजपठण न करता किंवा मुस्लिमांनी मंदिरात न जाताही दोन्ही धर्मांमधील बंधुभाव जोपासणे शक्य आहे.

नवी दिल्ली: महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाऊन शंकराची पूजा केल्यामुळे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना उत्तर प्रदेशातील एका मौलवीने टीका केली आहे. नक्वी यांनी शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करणे पूर्णपणे अयोग्य आहे. या कृतीनंतर त्यांनी हदयावर हात ठेवून सांगावे की, ते अल्लाहला याचे काय उत्तर देणार आहेत? आमच्या धर्मानुसार एखाद्या व्यक्तीने विशिष्ट देवतेची पूजा केली तर तो व्यक्ती त्या धर्माचा होतो. नक्वींच्या मनात एक आहे आणि ते करतात एक. हिंदुंनी नमाजपठण न करता किंवा मुस्लिमांनी मंदिरात न जाताही दोन्ही धर्मांमधील बंधुभाव जोपासणे शक्य आहे. धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करताही एखाद्या धर्माबाबत आपुलकी दाखवता येऊ शकते. मात्र, मुस्लीम व्यक्तीने मंदिरात जाऊन शंकराची पूजा करणे, हे इस्लामविरोधी आहे. नक्वी अशाचप्रकारे हिंदू- मुस्लिमांमधील बंधूभाव वाढवणार आहेत का?, असा सवाल सहारनपूरच्या मदरसा दारुल उलूम अशरफियाचे मौलाना सलिम अश्रफ कासमी यांनी केला. नक्वी सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त रामपूर येथील बागेश्वर शिव मंदिरात गेले होते. त्यावेळी नक्वी यांनी शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेकही केला. या सगळ्याची छायाचित्रे नक्वी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली होती. यावेळी त्यांनी धार्मिक सद्भावनेसाठी सर्व धर्मांचा आदर करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. रामपूरच्या बागेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीचा उत्सव हा देशाच्या सांस्कृतिक आणि सद्भावनेचे प्रतिक आहे, असे नक्वी यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीBJPभाजपा