शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

कोरोना पसरवणारेच स्वत:ला 'कोरोना वॉरियर्स' म्हणतायेत, 'या' केंद्रीय मंत्र्याचा तबलिगींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 17:48 IST

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर प्लाझ्मा डोनेट करण्यावरून निशाणा साधला आहे. कोरोना पसरवणारेच आता स्वतःला "कोरोना वॉरियर्स" म्हणत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमुख्तार अब्बास नक्वी यांचा तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर निशाणानक्वी म्हणाले, प्रत्येक भारतीय मुस्लीम व्यक्तीला तबलीगी सिद्ध करण्याचे हे ''तबलिगी शडयंत्र''तबलिगी जमातचे 10 सदस्य दिल्ली येथे कोरोना  पीडितांची मदत करत आहेत

नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी तबलिगी जमातशी संबंधित लोकांवर प्लाझ्मा डोनेट करण्यावरून निशाणा साधला आहे. कोरोना पसरवणारेच आता स्वतःला "कोरोना वॉरियर्स" म्हणत आहेत. कमाल आहे, असे नक्वी यांनी म्हटले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर हे प्रत्येक भारतीयमुस्लीम व्यक्तीला तबलीगी सिद्ध करण्याचे ''तबलिगी शडयंत्र'' असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात मुख्तार अब्बास नक्वी यांनी सोमवारी ट्विट केले. यात ते लिहितात, ''भारतात कोरोनाचा फैलाव करणारे तबलिगी स्वतःला "कोरोना वॉरियर्स" सांगत आहेत. कमाल आहे. तबलिगी आपल्या अपराधावर खेद करण्याएवजी ते लाखो कोरोना वॉरियर्सचा अपमान करत आहेत. यालाच म्हणतात "चोरी और सीनाजोरी"." 

CoronaVirus: 'त्या' अफवेमुळे इराणमध्ये हाहाकार; 728 जणांचा मृत्यू, शेकडो लोक झाले अंध

नक्वी यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "नक्कीच काही राष्ट्रभक्त मुस्लीम व्यक्तींनी गरजूंना प्लाझ्मा दिला आहे. मात्र, त्यांना तबलिगी म्हणणे योग्य नाही. प्रत्येक हिंदुस्तानी मुस्लीम व्यक्तीला तबलिगी सिद्ध करण्याचे "सुनियोजित घाणेरडे तबलिगी शडयंत्र" आहे.

Coronavirus: मुस्लिमांकडून भाज्या खरेदी करू नका; भाजपा आमदाराचं धक्कादायक विधान

तबलिगी जमातचे 10 सदस्य दिल्ली येथे कोरोना  पीडितांची मदत करत आहेत. त्यांनी त्यांच्या उपचारासाठी प्लाझ्माही दिला आहे. असे असतानाच नकवी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हे सर्वजण दिल्ली येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमातही सहभागी झाले होते. यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्लीMuslimमुस्लीमministerमंत्री