शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Mukhtar Abbas Naqvi : केंद्रीय मंत्रिपद टिकविण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वींसमोर दोन पर्याय; मोदींनी राज्यसभेचा एक रस्ता बंद केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 14:33 IST

Rajyasabha Election : नक्वी यांना उमेदवारी न देऊन भाजपाने लोकसभेबरोबरच राज्यसभेतूनही मुस्लिम चेहरा गमावला आहे. नक्वी यांच्यासोबत आणखी दोन भाजपा खासदार मुस्लिम होते. त्यांनाही यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना राज्यसभेचे तिकिट मिळाले नाही. त्यांचा कार्यकाळ ४ जुलैला संपत आहे. असे असले तरी नक्वी हे पुढील सहा महिने मंत्रिपदावर राहू शकतात. परंतू त्यांना या काळात राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्यत्व मिळवावे लागणार आहे. मोदींनी राज्यसभेचा एक दरवाजा बंद केला आहे. यामुळे नक्वींसमोर दोन पर्याय उरले आहेत. 

Rajya Sabha Election: मोदींनी आपल्याच मंत्र्याचा पत्ता कापला; राज्यसभेचे तिकीट नाकारले; राजीनामा घेणार?नक्वी यांना उमेदवारी न देऊन भाजपाने लोकसभेबरोबरच राज्यसभेतूनही मुस्लिम चेहरा गमावला आहे. नक्वी यांच्यासोबत आणखी दोन भाजपा खासदार मुस्लिम होते. त्यांनाही यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. राज्यसभा खासदार जफर इस्लाम यांना देखील तिकिट देण्यात आलेले नाही. आता नक्वींसमोर दोन पर्याय उरलेले आहेत. 

नक्वी हे छत्तीसगढच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले होते. ते उत्तर प्रदेशमधून लोकसभेवर जाऊ शकतात. आझम खान यांनी राजीनामा दिल्याने रामपूरमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. नक्वी यांना रामपूरमधून उतरविले जाण्याची चर्चा होऊ लागली आहे. नक्वी हे १९९८ मध्ये या जागेवरून खासदार झाले होते. परंतू, १९९९ आणि २००९ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रामपूर मतदारसंघातून सपाचे अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव निवडणूक लढवू शकतात. 

दुसरा पर्याय म्हणजे राष्ट्रपती नियुक्त खासदारांचा. राज्यसभेत १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतात. सध्या पाचच सदस्य आहेत. सात जागा रिकाम्या आहेत. जर रामपूरमधून लोकसभेत जाऊ शकले नाहीत तर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून ते राज्यसभेत जाऊ शकतात. 

आणखी एक मंत्री राजीनामा देणार...जेडीयूने आरसीपी सिंह यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत त्यांना मंत्रीपद सोडावे लागणार हे निश्चित आहे. आपण जुलैपर्यंत राज्यसभा सदस्य असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा