फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी ठरले अव्वल "गेमचेंजर"
By Admin | Updated: May 17, 2017 18:51 IST2017-05-17T17:00:12+5:302017-05-17T18:51:22+5:30
कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल आणि आपल्या क्षेत्रात मोठा बदल करणा-या जगातील 25 जणांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी अव्वल ठरले

फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी ठरले अव्वल "गेमचेंजर"
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात बदल आणि आपल्या क्षेत्रात मोठा बदल करणा-या जगातील 25 जणांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी अव्वल ठरले आहेत. फोर्ब्सकडून जारी करण्यात आलेल्या वर्ल्ड गेंमचेंजर" यादीत मुकेश अंबानींनी " पहिलं स्थान पटकावलं आहे.
"वर्ल्ड गेंमचेंजर" अशा 25 जणांची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. त्यात मुकेश अंबानी पहिल्या स्थानी आहेत. मुकेश अंबानी यांच्याशिवाय या यादीत "डायसन" कंपनीचे संस्थापक जेम्स डायसन, सौदी अरबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, आफ्रिकेतील रिटेल टायकॉन क्रिस्टो वीजे आणि अमेरिकन ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ब्लॅक रॉकचे संस्थापक लॅरी फिंक आदींचा समावेश आहे.
अंबानींनी "जिओ"च्या माध्यमातून भारतात इंटरनेट क्रांती केलीच शिवाय लाखो सामान्य नागरिकांपर्यंत इंटरनेट सुविधा पोहचवली असल्याचा उल्लेख फोर्ब्सने केला आहे. याशिवाय जियोच्या लॉन्चिंगपासून इतर कंपन्यांमध्ये धास्ती पसरली आणि मोठ्या स्पर्धेला सुरूवात झाली. मागील सहा महिन्यात जिओने सुमारे 10 कोटी ग्राहक जोडले. जिओच्या स्वस्त इंटरनेट सर्व्हिसमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांनादेखील आपल्या धोरणात बदल करावा लागला असंही फोर्ब्सनं म्हटलं आहे.