शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मोगलांनी मंदिरं तोडली, आज त्यांचे वंशज रिक्षा चलवतायत - CM योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 21:57 IST

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी गाझियाबादमध्ये समोर आलेल्या ऑनलाईन धर्मांतरणाच्या मुद्यावरही भाष्य केले.

आम्ही कुठल्याही परिस्थितीत संस्कृतीवरील हल्ला खपवून घेणार नाही. आम्ही आधीच मोगल आणि इंग्रजांची गुलामगिरी भोगली आहे. मात्र जेव्हा आमच्या संस्कृतीवर हल्ला झाला, तेव्हा 1857 च्या क्रांतीच्या रुपाने आम्ही उत्तर दिले. जोवर मोगल मंदिरांमध्ये शिरले नाही, तोवर राज्य करत राहिले. मात्र जेव्हा मंदिरांमध्ये शिरले, तर आज त्यांचे वंशज रिक्षा चालवत आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी गाझियाबादमध्ये समोर आलेल्या ऑनलाईन धर्मांतरणाच्या मुद्यावरही भाष्य केले. ते रविवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सेव्ह कल्चर सेव्ह इंडिया कार्यक्रमात बोलत होते. योगी म्हणाले, अशा धर्मांतरणाचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. मात्र आता असे होणार नाहीत. शोषितांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणे आवश्यक आहे. त्यांना समजावून सांगावे लागेल, त्यांना आपल्या प्राचीन संस्कृतीची आठवण करून द्यावी लागेल. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी सन्मानित करण्यात आलेल्या संस्कृती योद्ध्यांनाही शुभेच्छा दिल्या. 

योगी आदित्यनाथ म्हणाले, 48 वर्षांपूर्वी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला गेला. जर ते त्या वेळी यशस्वी झाले असते, तर आज आपण असे कार्यक्रम करू शकलो असतो का? असा सवाल करत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीही काही नियम असतील.

सीएम योगी म्हणाले, जगातील सर्व देशांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. फ्रान्स कलेसाठी प्रसिद्ध आहे, तर ब्रिटनचीही आपली एक वेगळी ओळख आहे. याच पद्धतीने भारताचीही आपली एक वेगळी ओळख आहे. मोगल आणि इंग्रजांची गुलामगिरी आपण भोगली आहे. मात्र आपल्या संस्कृतीवर आक्रमण होताच आपण 1857 च्या क्रांतीच्या रूपाने प्रत्युत्तर दिले. गायीच्या चरबीपासून बनवलेल्या काडतुसांना विरोध केला. पुढे जाऊन वीर सावरकरांनीही याला मान्यता दिली. यावेळी योगी स्पष्ट शब्दात संदेश देताना म्हणाले, आमच्या संस्कृतीशी आणि आमची श्रद्धा यांच्यासोबत छेडछाड कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा