शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुघल आपले पूर्वज नसून लुटारु होते, यापुढे असाच इतिहास लिहिला जाईल - दिनेश शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 18:32 IST

भारतात राज्य करणारे मुघल आपले पूर्वज नसून एकप्रकारचे लुटारु होते आणि आता अशाच इतिहास यापुढे लिहिला जाणार असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे.

लखनऊ, दि. 12 - भारतात राज्य करणारे मुघल आपले पूर्वज नसून एकप्रकारचे लुटारु होते आणि आता असाच इतिहास यापुढे लिहिला जाणार असल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे. येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दिनेश शर्मा म्हणाले की, मुघलांनी चांगली कामे केली आहेत, त्यांची आम्ही स्तुती सुद्धा करतो. मात्र, आपली संस्कृती मिटवता येणार नाही. आपल्याला इतिहास विसरुन चालणार नाही, असे केले तर विकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या मुघलांनी चुकीची कामे केली आहेत, त्यांना आम्ही लुटारु म्हणतो.  बाबर आणि औरंगजेब लुटारु होते. शाहजहॉं हात कापणारा व्यक्ती होता. मात्र, मंगल पांडे यांनी ज्यावेळी क्रांतीची सुरुवात केली, त्यावेळी बहादूर शाह जफर यांनी त्यांचे समर्थन केले होते. तसेच, बहादूर शहा जफर यांनी भारतात होणा-या गोहत्येला सुद्धा विरोध दर्शविला होता, असे आजतक या वृत्तवाहिनीच्या सफाईगिरी कार्यक्रमात दिनेश शर्मा बोलत होते.ते म्हणाले, आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. मी मंदिरात जाऊन पूजा करतो. तसेच, मशिद आणि गुरुद्वारामध्ये सुद्धा जातो. पंतप्रधान नरेंद्र मोगी बहादूर शाह जफर यांच्या दर्गात गेले होते, त्यावर बोलताना दिनेश शर्मा म्हणाले की, बहादूर शाह जफर एक चांगले मुघल शासक होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारमधील त्यांच्या दर्गात गेले होते. तसेच, अबकरने चांगली कामे केली असतील तर ती इतिहासातील पानावर राहतील. याबाबत इतिहासकार निर्णय घेतील, असेही दिनेश शर्मा म्हणाले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश