राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून सर्वांना खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 04:29 IST2018-02-06T04:29:37+5:302018-02-06T04:29:45+5:30
तुम्ही या महिनाभरात दिल्लीत जाणार असाल, तर राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी आहे.

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आजपासून सर्वांना खुले
तुम्ही या महिनाभरात दिल्लीत जाणार असाल, तर राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी आहे. पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. एकट्या गुलाबाच्याच तिथे १५0 हून अधिक जाती आहेत, शिवाय कधीच न पाहिलेली फुले आणि त्यांची झाडे तिथे आहेत. दिल्ली शहराची उभारणी करणारा सर एडवर्ड ल्युटन्स याने या मुघल गार्डनची उभारणी केली होती. ब्रिटिश काळातील भारतातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्जच्या पत्नीसाठी ते उभारण्यात आले. मुघल गार्डन उद्या, ६ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. मात्र, दर सोमवारी ते देखभालीसाठी बंद राहील आणि २ मार्च रोजी होळीनिमित्तही ते बंद राहणार आहे. आणि हो, ते पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही.