Mughal Garden Name Change: राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले; 31 जानेवारीपासून खुले होणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 05:33 PM2023-01-28T17:33:52+5:302023-01-28T17:34:32+5:30

लोक या ठिकाणी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत फिरण्यासाठी येऊ शकतात. येथे ट्युलिप आणि गुलाबाच्या शेकडो प्रजाती आहेत. राष्ट्रपती भवनात असलेले अमृत उद्यान हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे.

Mughal Garden Name Change: Mughal Garden in Rashtrapati Bhavan has been renamed as Amrit Udyan; Will be open from 31st January... | Mughal Garden Name Change: राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले; 31 जानेवारीपासून खुले होणार...

Mughal Garden Name Change: राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नाव बदलले; 31 जानेवारीपासून खुले होणार...

googlenewsNext

राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन हे गेल्या अनेक दशकांपासून जगभरात प्रसिद्ध आहे. अशा या प्रसिद्ध गार्डनचे नाव बदलण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून हे गार्डन यापुढे अमृत उद्यान या नावाने ओळखले जाणार आहे. हे गार्डन दरवर्षी सामान्य लोकांसाठी मोफत खुले केले जाते. 

अमृत गार्डन हे ३१ जानेवारीपासून सामान्यांसाठी खुले केले जाणार आहे. लोक या ठिकाणी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत फिरण्यासाठी येऊ शकतात. येथे ट्युलिप आणि गुलाबाच्या शेकडो प्रजाती आहेत. राष्ट्रपती भवनात असलेले अमृत उद्यान हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मोठे केंद्र आहे. येथे ब्रिटीश आणि मुघल दोन्ही उद्यानांची झलक पाहायला मिळते. ते तयार करण्यासाठी, एडविन लुटियन्सने प्रथम देश आणि जगाच्या उद्यानांचा अभ्यास केला. या बागेत रोपे लावण्यासाठी सुमारे एक वर्ष लागले होते. 

138 प्रकारचे गुलाब, 10,000 पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5,000 हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान सामान्यांसाठी उपलब्ध नव्हते. परंतू, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वसामान्यांसाठी खुले केले होते. तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुले केले जाते.

15 एकरात पसरलेल्या या उद्यानाची निर्मिती ब्रिटिश राजवटीत करण्यात आली होती. मुघल गार्डन हा देशाच्या राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे, असे म्हटले जाते. मुघल गार्डन्सचा एक भाग गुलाबांच्या विशेष प्रकारांसाठी ओळखला जातो. 

राष्ट्रपतींच्या उप माहिती अधिकारी सचिव नाविका गुप्ता म्हणाल्या की, मुघल गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी सर्व झाडांजवळ QR कोड लावण्यात येणार आहेत. यासोबतच आणखी एक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दररोज सुमारे 20 गाईड येथे मार्गदर्शक म्हणून काम करतील. येथे येणाऱ्या लोकांना वनस्पती आणि फुलांशी संबंधित माहिती ते देतील. 

Web Title: Mughal Garden Name Change: Mughal Garden in Rashtrapati Bhavan has been renamed as Amrit Udyan; Will be open from 31st January...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.