शेवटच्या क्षणापर्यंत चिखलफेक सुरूच
By Admin | Updated: February 6, 2015 02:14 IST2015-02-06T02:14:53+5:302015-02-06T02:14:53+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आम आदमी पार्टी आणि भाजप यांची एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत चिखलफेक सुरूच
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आम आदमी पार्टी आणि भाजप यांची एकमेकांवर चिखलफेक सुरूच आहे. भाजप मतदारांना पैसे आणि मोफत मद्य वाटप करून मते खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आपने गुरुवारी केला.
हा पक्ष लोकांना पैसे, मद्य आणि मांसाहारी खाद्यपदार्थांचे वाटप करीत असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. एवढेच नाहीतर गरिबांची मतदार ओळखपत्रेही ताब्यात घेण्यात येत आहेत, अशी तक्रार आपचे नेते आशुतोष यांनी केली. आपला मतदान केले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या देऊन मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचाही प्रकार सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
४आपच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहा म्हणाले की, या निवडणुकीत त्यांनी (आप) आपल्या पक्षाची तिकिटे विकली. त्यांचे उमेदवार निवडणुकीत मोफत मद्यपुरवठा करण्यासाठी त्याची जमवाजमव करताना आढळून आले आहेत.
४सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगावरसुद्धा आरोप करण्याची त्यांना सवय आहे; परंतु आपल्याला मात्र कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे नाही, असा त्यांचा समज झाला आहे. हवालामार्फत निधी गोळा करणे आणि काळ्या पैशाच्या आरोपात हाच पक्ष सध्या गोवला गेला आहे, याकडेही नरसिंहा यांनी लक्ष वेधले.