कुडचडेच्या नवीन इमारतीची मंग
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:50+5:302015-08-20T22:09:50+5:30
कुडचडेच्या नवीन इमारतीची मंगळवारी पायाभरणी

कुडचडेच्या नवीन इमारतीची मंग
क डचडेच्या नवीन इमारतीची मंगळवारी पायाभरणीकुडचडे : कुडचडे पालिकेच्या खास बैठकीमध्ये पालिका प्रशासनाची नवीन इमारतीबाबत तसेच सुशोभीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या नवीन इमारतीची पायाभरणी येत्या 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.या बैठकीला कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, मुख्याधिकारी आग्नेल फर्नाडिस, नगराध्यक्ष अनिता नाईक, उपनगराध्यक्ष प्रदीप नाईक,नगरसेवक रोशा परेरा, बाबुराव देसाई, पालिका अभियंते उदय देसाई तसेच शिवम इन्फ्राटिक कंपनीचे अब्दुला कुंजीपुटी, आर्शफ अब्दुला, समीर किनळेकर उपस्थित होते.या बैठकीच्यावेळी इमारतीच्या आराखड्याविषयी चर्चा करण्यात आली. या तीन मजली नवीन पालिका इमारतीच्या तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था, तसेच दुकानगाळे बांधण्यात येणार आहे. इमारतीच्या पहिल्या व दुसर्या मजल्याचा वापर पालिकेचे ऑफीस असणार आहे. दुसर्या व तिसर्या मजल्याचा वापर मिनी चित्रपटगृहासाठी वापरण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 22 कोटी खर्च अपेक्षित आहे तर सुशोभीकरणासाठी 8 कोटी इतका खर्च येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. इमारतीचा ताबा मिळण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)ढँ3 : 1808-टअफ-05कॅप्शन: पालिकेच्या बैठकीत चर्चा करताना कुडचडेचे आमदार निलेश काब्राल तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक. (छाया: साईप्रसाद साळोके)